Rohit Pawar Video: DGCA विरोधात गुन्हा दाखल करा; रोहित पवारांसह अमोल मिटकरी पोलिसांवर भडकले, पाहा व्हिडिओ

Ajit Pawar Plane Crash Case: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील कारवाईला विलंब होत असल्याने आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. DGCA विरोधात FIR दाखल करण्यासाठी ते अमोल मिटकरी यांच्यासह मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोहोचले.
Rohit Pawar Video
Rohit Pawar VideoPudhari
Published on
Updated on

DGCA FIR Rohit Pawar Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील दिरंगाईवर आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात थेट नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच Directorate General of Civil Aviation (DGCA) विरोधात FIR दाखल करण्याची मागणी करत रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले.

त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. विमान अपघातानंतर संबंधित VSR कंपनीवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने, त्यासाठी जबाबदार असलेल्या DGCA विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी ठाम भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.

Rohit Pawar Video
Rohit Pawar On FIR : त्या मोठ्या अधिकाऱ्याला कोणाचा फोन आला... FIR गोंधळाबाबत रोहित पवार स्पष्टच बोलले

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात सुरुवातीला अधिकाऱ्यांकडून FIR नोंदवण्यास टाळाटाळ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे रोहित पवार आणि अमोल मिटकरी दोघेही आक्रमक झाले. “आमच्या घरातील माणूस गेला आहे, राज्याचा एक महत्त्वाचा नेता अपघातात मृत्युमुखी पडला आहे. अशा गंभीर घटनेत FIR न घेणं ही मोठी बेपर्वाई आहे,” असे सांगत रोहित पवार यांनी पोलिसांसमोर आपली भूमिका मांडली.

FIR दाखल न झाल्यास पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संबंधित झोनचे डीसीपी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. प्रशासनाने प्रथम तक्रार नोंदवावी असे सांगितले होते, मात्र रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे FIR वरच आग्रही आहेत.

Rohit Pawar Video
Ajit Pawar | अजितदादा गेले, पुढे काय?

ज्यावेळी रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी तिथं जे अधिकारी होते, त्यांच्याकडून सुरुवातीला एफआयआर दाखल करण्यास नकार देण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून, विमान अपघाताच्या चौकशीला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता पोलिस आणि DGCA पुढे काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news