Wavhehaveli Dam Waterfalls: वावेहवेली धरण झाले पर्यटकांनी फुल्‍ल; धबधब्यांच्‍या दिशेने पर्यटकांची पावले

तळा तालुक्यातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण
Wavhehaveli Dam Waterfalls
Wavhehaveli Dam WaterfallsPudhari
Published on
Updated on

संध्या पिंगळे

तळा: गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसाने वावेहवेली धरण फुल झाला असून धबधबे वाहण्यास सुरूवात झाली आहे. तसेच तालुक्यातील ही अनेक ठिकाणी हे धबधबे वाहण्यास सुरूवात झाल्याने पर्यटकांची पावले या धबधब्यांकडे वळण्यास सुरूवात झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

तळा तालुक्यात धबधब्यांचे आकर्षण वाढत असल्याने शनिवार, रविवार धबधबे होतात फुल. गोवा - मुंबई हायवेपासून ११ की.मी. अंतरावर वावेहवेली धरण आहे या वावेहवेली धरण क्षेत्रातील धबधबे पर्यटकांसाठी एक पर्वणी आहे.या धबधब्या बरोबरच तसेच तळेगाव, गायमुख भागातही धबधब्यांवर पर्यटकांची वर्दळ दिसत आहे.

Wavhehaveli Dam Waterfalls
Matheran Stray Cattle: माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांवर मोकाट गुरांचा हल्ला

कुडालेणी, तळगड, तळा तालुका हा एक निसर्गाचा मोठा साठा आहे त्यात पावसाळा सुरु झाल्याने धबधबे वाहू लागले असून धरणे फुल झाली आहेत. 

आता एक मोठी पर्वणी पर्यटकांसाठी व कॉलेज युवकांसाठी असते दऱ्या खोऱ्यातील या तालुक्यात अनेक ठिकाणी छोटे मोठे धबधबे व धरणावरील निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी कॉलेज कुमार ते पर्यटक मोठ्या संख्येने रविवारी मोठ्या प्रमाणात येतात व निसर्गाचा आनंद लुटून जातात. 

वावेहवेली येथील धरणात पावसाळ्यात जास्त होणारा पाणी (ओव्हरफ्लो) काढण्यासाठीचा जो भाग आहे त्या पाण्याच्या स्रोतावरती येणारे पर्यटक व तरुण मौजमजा करत पोहत उड्या मारत असतात व मनमुराद आनंद लुटत असतात.

धबधब्यांमध्ये एक कुंबेटचा धबधबा आहे. या धबधब्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होताना पहावयास मिळत आहे. यामुळे येथील नागरिकांना येणारे पर्यटक जेवणाची ऑर्डर देत असतात तर काही तळा शहरातून जेवण व इतर खाद्यपदार्थ नेत असतात त्यामुळे येथील नागरिकांना थोडा का होईना परंतु हाताला काही दिवस काम मिळत असते.

Wavhehaveli Dam Waterfalls
Bhiwandi Dumping Ground: डम्पर मागे घेताना चिमुरडीचा अंत

तळेगाव जवळील धोदानी धबधबा हा आता प्रसिध्दीस येत आहे या धबधब्यावरती तर आता मोठ्या प्रमाणात निसर्गप्रेमी येत असून हे ठिकाण त्यांच्यासाठी एक पर्वणीचआहे निसर्गाच्या नयनरम्य अशा झाडीवेलींतून डोंगरावरुन कोसळणाऱ्या रमणीय धोदानी धबधब्यावर निसर्गाच्या सानिध्यात वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी येथे दुरवरुन पर्यटक येत असतात.

तळा तालुक्यापासुन सात कि.मी. तर मुंबई गोवा मार्गावरील माणगाव जवळील खरवलीपासून दहा कि.मी. तळेगाव आहे. तळेगावपासून धोदानी धबधब्यांवर जाण्यास दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ लागतो. तसेच मुंबई गोवा हायवे पासून अंदाजे ११ का.मी अंतरावर वावेहवेली धरणक्षेत्र आहे. दरवर्षाप्रमाणे याहीवर्षी पर्यटक या स्थळांना अधिक प्रमाणात भेट देतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आता या धबधब्यांना पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.

पर्यटनाला चालना

तळा तालुक्यातील तळेगावचा धबधबा व बोरीच्यामाळचा धबधबा नावारुपाला येत असून मालाठेवाडी, मालुक याभागातही पर्यटनाला चालना देणारे धबधबे असून या धबधब्यावरती एक ते दिड कि. मी. च्या अंतराएवढे चालत जावे लागते या ठिकाणी तळीराम मात्र न चुकता धबधब्यांवरती रविवारी मजा लुटण्यासाठी जात असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news