Matheran Stray Cattle: माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांवर मोकाट गुरांचा हल्ला

नगरपरिषद प्रशासन या मोकाट गुरांचा बंदोबस्त करणार का? बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
Matheran Stray Cattle
Matheran Stray CattlePudhari
Published on
Updated on

आनंद सकपाळ

नेरळ: पर्यटननगरी माथेरानमध्ये पर्यटन हंगाम सुरू असताना मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील बाजारपेठ व प्रमुख पर्यटनस्थळांवर मुक्तपणे फिरणाऱ्या मोकाट गुरांमुळे नागरिक, व्यापारी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

१० जुलै रोजी सायंकाळी माथेरानच्या मुख्य बाजारपेठेतील श्रीराम चौकात घडलेल्या घटनेत ७० वर्षीय पर्यटक प्रकाश पडवळ यांच्यासह तीन ते चार जणांवर मोकाट गुरांनी हल्ला केल्याने या समस्येची तीव्रता पुन्हा अधोरेखित झाली आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून संबंधित व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.

Matheran Stray Cattle
Bhiwandi Dumping Ground: डम्पर मागे घेताना चिमुरडीचा अंत

माथेरानमध्ये मोकाट गुरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणे, रस्त्यांवर शेण साचल्याने घसरून अपघात होणे तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागत असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर तत्कालीन माजी नगरसेवक चंद्रकांत धोंडू जाधव यांनी ८ नोव्हेंबर २०२४ रोजी माथेरान गिरीस्थान न.प. कडे निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. तसेच २७ नोव्हेंबर २०२४ रोजी श्रीराम मंदिर चौक येथे जाहीर उपोषण करण्याचाही इशारा दिला होता.

या निवेदनाची दखल घेत माथेरान गिरीस्थान न.प. प्रशासनाने २२ नोव्हेंबर २०२४ रोजी लेखी उत्तर देत संबंधित विभागाला मोकाट गुरांना पकडून कोंडवाड्यात ठेवणे, आवश्यक असल्यास त्यांचा लिलाव करणे तसेच या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिले होते.

तसेच चंद्रकांत जाधव यांना नियोजित उपोषण मागे घेण्याची विनंतीही करण्यात आली होती. दरम्यान, माथेरान न.प.कडून गोशाळा उभारण्यात आली असली तरी सध्या ती बंद असून त्या ठिकाणी एसटीपीचे काम सुरू आहे. मोकाट गुरांना ठेवण्यासाठी प्रभावी व्यवस्था उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.

Matheran Stray Cattle
Pandharpur Vitthal Idols: आषाढीत मूर्तींच्या बाजारातून होते पंधरा कोटींची उलाढाल

पर्यटननगरीची स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक प्रतिमा जपण्यासाठी तसेच पर्यटकांच्या जीविताची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मोकाट गुरांचा तातडीने व कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

श्रीराम चौक परिसरात तीन-चार बैल आणि दोन-तीन गाईंचा कळप एकमेकांशी झुंज देत व चिडलेल्या अवस्थेत धावत होता. आमच्या डोळ्यांसमोरच एका गाईने ७० वर्षीय पर्यटक प्रकाश पडवळ यांच्यावर हल्ला करून जमिनीवर पाडले. त्याचवेळी एका अन्य व्यक्तीला धडक दिली, तर आणखी दोन-तीन जणांच्या अंगावरही हा कळप धावून गेला. मोकाट गुरांकडून हल्ले अत्यंत गंभीर असून, भविष्यात एखादी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. न.प.ने मोकाट गुरांचा बंदोबस्त करून व्यवस्था गोशाळेत करावी.

- रूपेश गुजरे, पर्यटक

श्रीराम चौकात तीन चार बैल व दोन तीन गाईंचा कळप हा चिडलेल्या व मस्ती करत असता, आमच्या डोळ्या देखत एका गाईनी एक ७० वर्षीय पर्यटकावर एका गाईने ह्ल्ला केला. तर एका व्यक्तीला पाठीमागून ठोकर मारली त्यांनंतर दोन तीन व्यक्तींच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला आहे. सध्या पावसाळी पर्यटन हंगाम असल्याने, अशा मोकाट गुरांमुळे पर्यटकांच्या जिवितास धोका आहे.

- रूपेश गुजरे, पर्यटक

पर्यटकांवर झालेल्या ताज्या हल्ल्याची घटना, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला प्रकार आणि जवळपास दोन वर्षांपूर्वी न.प.कडून देण्यात आलेले लेखी आश्वासन यामुळे आता एकच प्रश्न उपस्थित होत आहे. माथेरान न.प. प्रशासन प्रत्यक्षात कठोर कारवाई करणार का, की मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा एकदा केवळ आश्वासनांपुरताच मर्यादित राहणार?

चंद्रकांत जाधव, माजी नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news