Bhiwandi Dumping Ground: डम्पर मागे घेताना चिमुरडीचा अंत

संतप्त नागरिकांनी डम्पिंग ग्राउंड कार्यालयाची मोडतोड करत डम्पर जाळले
Bhiwandi Dumping Ground
Bhiwandi Dumping GroundPudhari
Published on
Updated on

भिवंडी: भिवंडीतील कचरा टाकला जाणाऱ्या चाविंद्रा रामनगर येथील डम्पिंग ग्राउंडवर डम्पर मागे घेताना चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

या दुर्घटनेनंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी येथील पालिका कर्मचाऱ्यांची केबिन कार्यालयाची तोडफोड करून डम्पर जाळण्याची घटना घडली आहे. शनाया अब्दुल हक (३) असे मयत चिमुरडीचे नाव आहे.

Bhiwandi Dumping Ground
Pandharpur Vitthal Idols: आषाढीत मूर्तींच्या बाजारातून होते पंधरा कोटींची उलाढाल

मिळालेल्या माहितीनुसार रामनगर येथील महिला आपल्या चिमुरडीला घेऊन डम्पर ग्राउंड शेजारील एका गाळ्यात काम करण्यासाठी गेली होती.

त्यावेळी लहान शनाया ही रस्त्यालगत खेळत असताना त्या सुमारास डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यासाठी आलेल्या डम्पर क्रमांक एम एच ०४ डी के ११६६ हा उभा असताना चालकाने अचानक मागे घेतला असता त्याच्या चाकाखाली चिमुरडी आल्याने तिचा जागेवरच दुर्दैवी अंत झाला आहे.

या घटनेनंतर स्थानिकांनी चिमुरडीला स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Bhiwandi Dumping Ground
Fake DCP Fraud: बोगस डीसीपींनी केली कोट्यवधींची फसवणूक; गुन्हे शाखेकडून तीन गुन्ह्यांचा तपास

नागरिक संतप्त

दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी डम्पिंग ग्राउंडवरील पालिका कर्मचाऱ्यांचे कार्यालयातील फर्निचरची तोडफोड करीत बाहेर फेकून दिले. तर तेथे अपघात करणाऱ्या डम्परला जाळले आहे. या नंतर घटनास्थळी मोठा पोलीस तैनात करण्यात आला असून भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news