

मुरुड जंजिरा : मुरुड शहरातून जाते अनेकठिकाणी प्रमुख नाले सफाई नसल्याने पाणी समुद्राकडे जाताना अडथळे येतात. त्यातील प्रथम पेठ मार्गे गोल बांगला रस्ता नेहमी 3 फूट पाणी साचलेले असते. यासाठी मधल्या आळीतून जाणारे पाणी अंबुकरवाडी पर्यंत जाते. पुढे समुद्राकडे जाण्याचा मार्ग व नाले मोठा करण्याची गरज असून शहरातील नालेसफाई तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे.
मुरुड शहर आणि परिसरात 3500 मिमी पाऊस होतो. जुलै महिन्यात सातत्याने पडणारा पाऊस शहरातून पाणी जाण्याचे मार्ग मोठे नसल्याने व नाले सफाई न झाल्याने पाणी शहरात अनेक ठिकाणी तुंबते. दत्तमंदिर क्षेत्रफळ परिसरात होणारा पाऊसाचे पाणी समुद्राकडे जाताना मुरुड शहरातून जाते.
अनेक ठिकाणी प्रमुख नाले सफाई नसल्याने पाणी समुद्राकडे जाताना अडथळे येतात. त्यातील प्रथम पेठ मार्गे गोल बांगला रास्ता नेहमी 3 फूट पाणी साचलेले असते. यासाठी मधल्याआळीतून जाणारे पाणी अंबुकर वाडीपर्यंत जाते पुढे समुद्राकडे जाण्याचा मार्ग व नाले मोठा करण्याची गरज आहे.
दुसरे ठिकाण दत्तवाडी ते पोलीस ठाणे मार्ग डोंगरावरून येणारे पाणी व 4 पाखाड्यातून येणारे पाणी रस्त्यालगतच्या मोठ्या नाल्यातून समुद्राकडे जाते. या मार्गवरील 3 मोऱ्या बुजल्यात व अखेरची पोलीस ठाणेजवळची मोरीचे तोंड अतिशय लहान असल्याने अति पाऊसात वाहून येणारे पाणी शेवटच्या मोरीत अडकते आणि पुन्हा पाखडीतील वाड्यांमध्ये शिरते रस्त्यावर येते आणि वाड्यांचे नुकसान होते. म्हणून पोलीस ठाणे येथील मोरी तातडीने मोठी करणे गरजेचे ती मोरी सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे कि नगरपालिकेची ते न पाहता एकत्र येऊन पाऊसाचे पाणी जाण्याचा मार्ग खुला करण्याचे प्रयत्न झाला पाहिजे.
सध्या मुरुड शहरात विकास कामे रस्ते, गटार बांधणे, गटार सफाई, मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. पालिका कामांचे नियोजन करताना रास्त्यावरील अनधिकृत पार्किंग हटवायचे काम करत नाही. त्यामुळे बाजारात गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होते.
प्रथम बाजारात अनधिकृत उभ्या राहणाऱ्या रिक्षा तातडीने हलवणे. पाइपलाइनचे काम होईपर्यंत भाजीवाले, जड वाहतूक बंद करण्यात यावी व पालिकेच्या ठेकेदारांनी काम टप्प्या टप्प्याने करणे, सगळेच मार्ग खोदून ठवल्याने रस्त्यावर चालायला जागा राहत नाही व वाहतूक कोंडी निवारणासाठी पोलीस नसल्याने नागरिकांना वादावादीला सामोरे जावे लागते. याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.
अखेर बाजार पेठेतील पाणी साचण्याची समस्यांवर पालिकेने बाजारातील मोऱ्या नवीन बनवल्या परंतु बाजारातून समुद्राकडे पाणी ज्या वाडीतून जाते ते मार्ग कचऱ्याने भरल्या. त्यामुळे पाणी अडकून बाजारात पाणी साचते. एसटी स्थानक परिसरात पाणी भरल्याने व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.