Jalna News : करंजगाव-पिंपळगाव रेणुकाई रस्त्याची दुरवस्था

रस्त्यावर खड्डेच खड्डे, वाहनचालकांना त्रास, रस्ता दुरुस्तीची मागणी
Karanjgaon Pimpalgaon Renukai road condition
पिंपळगाव रेणुकाई ः करंजगाव-पिंपळगाव रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.pudhari photo
Published on
Updated on

पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील करंजगाव ते पिंपळगाव रेणुकाई या महत्त्वाच्या ग्रामीण मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या शेकडो वाहनचालक व नागरिकांचे हाल होत आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.

सुमारे 5 किमी लांबीच्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबर आणि पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी, दुचाकी, चारचाकी वाहनांचे अपघात वाढले असून गाड्यांचे मोठे नुकसान होत आहे. स्थानिक शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापारी याच मार्गाने मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे 20 मिनिटांचा प्रवास आता एक तासापेक्षा जास्त वेळ घेत आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Karanjgaon Pimpalgaon Renukai road condition
Pimpri Chinchwad Bicycle Sharing Project: पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा सायकल शेअरिंग; स्थायी समितीकडून विकासकामांना मंजुरी

रुग्णवाहिका आणि शाळेच्या बसही या मार्गावरून धडकी भरतच प्रवास करतात ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी झालेली नाही संबंधित विभागाने प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. पावसाळा तोंडावर आल्याने आता तर परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे. “खड्ड्यांमुळे आमच्या गाड्यांचे टायर, सस्पेन्शन वारंवार खराब होतात पेट्रोल-डिझेलचा खर्चही दुप्पट होत वाहन चालकाने सांगितले हा रस्ता शेतमाल वाहतुकीसाठी मुख्य मार्ग आहे.

Karanjgaon Pimpalgaon Renukai road condition
Pavana Maval MIDC: पवन मावळात MIDC भूसंपादनाला सुरुवात; शेतकऱ्यांना हरकतीची संधी

शासनाने तातडीने लक्ष घालून डांबरीकरण करावे वाहनचालक व नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला असून पावसाळ्यापूर्वी काम सुरू न झाल्यास रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे.

पिंपळगाव रेणुकाई मुख्य बाजारपेठ असल्याने या बाजारपेठेत

सिल्लोड, आव्हाणा, वाकडी, कल्याणी, करंजगाव या या मार्गाने वाहनांची संख्या जास्त वाढली आहे. मात्र रस्ता खराब झाल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रोडची संबंधित विभागाने तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news