Velas Diveagar Bridge: कोकणातील दोन पर्यटनस्थळे जोडणारा पूल कधी होणार? वेळास-दिवेआगर पुलाकडे लक्ष वेधले

कोकण किनारी मार्गावरील अनेक पुलांची कामे प्रगतिपथावर; वेळास-आगर आणि दिवेआगरला जोडणाऱ्या पुलाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित
Velas Diveagar Bridge
Velas Diveagar BridgePudhari
Published on: 
Updated on: 

वेळास-आगर: कोस्टल हायवे वरील करंजा-रेवस, रेवदांडा-साळाव, दिघी जवळील तुरुंबाडी - टोकेखार, बागमांडले वेश्वी या पुलांची कामे सध्या प्रगतीपथावर आहे. या बरोबर साखरी - केळशी, दाभोळ, जयगड, कुणकेश्वर या पुलांचा उल्लेख होतो.

मात्र बहुचर्चित रेवस ते रेड्डी या सागरी मार्गावरील वेळास-दिवेआगर खाडीवरील प्रस्तावित पुलाचा उल्लेख आता होत नाही.

नुकताच खासदार सुनील तटकरे यांचा दौरा झाला. बागमांडले ते कुडगांव दरम्यान महत्वाच्या ठिकाणी श्रीवर्धन तालुक्यातील विविध कामांचे लोकार्पण, उद्घाटन, काही कामांची प्रत्यक्ष पाहणी झाली.

श्रीवर्धन तालुक्यातील सुवर्ण गणेशाची सुवर्ण भूमी दिवेआगरच्या बरोबरीने आता वेळास आगर बीच पर्यटकांना खुणावत आहे. वेळास-आगर आणि दिवेआगरमध्ये छोटी खाडी आहे. अतिशय सुंदर आणि देखण्या खाडीवर पूल व्हावा अशी कित्येक वर्षांपासून या प्रस्थावित पूलाची मागणी आहे.

Velas Diveagar Bridge
Mahad Crime News: सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ; पतिसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

यामुळे पाच किलो मीटरचा प्रवास केवळ तीन मिनिटात होणार आहे. त्या बरोबरच श्रीवर्धन, हरिहरेश्ववर, मुरुड-जंजिरा येथे आलेल्या पर्यटकांचा ओघ दिवेआगर, वेळास, आदगांव कडे असतो.

या खाडीवर पूल झाल्यास वेळास-आगर येथील सुंदर समुद्र किनाऱ्याचा मनमुराद आनंद, आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे वेळास गावाला पर्यायाने पंचक्रोशीतील गावांना त्याचा फायदा होणार आहे.

या बाबतचे वृत्त १९८० च्या दशकातील माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅ. ए.आर.अंतुले यांच्या स्वप्नातील रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, आताचा बहुचर्चेत असलेला कोस्टल हायवे, या मार्गावरील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिवेआगर-वेळास आगर खाडी वरील हा त्या काळापासून प्रस्थावित पूल परंतु बॅ.अंतुले यांच्या मुख्यमंत्री पदाच्या अल्प कालावधी मुळे या मार्गाच्या कामाला चालना न मिळाल्याने रेवस ते रेड्डी मार्गावरचा या खाडी वरील पूल राज्य शासनाच्या कागदावरच राहिला होता.

मात्र गेल्या २०-२५ वर्षातील सरकारच्या काळात कोस्टल हायवे महामार्ग पुन्हा चर्चेत येऊ लागला.आता त्याला गती प्राप्त झाली या मार्गाचे काही ठिकाणी जोरदार कामं सुरू आहेत.काही पुलांच्या कामांना सुरवात झाली.

Velas Diveagar Bridge
Panvel Water Shortage: पनवेलकरांची पाणीटंचाई मिटणार? जांभिवली धरणातून रोज १५ एमएलडी पाणी मिळण्याची शक्यता

नोव्हेंबर १९९७ रोजी दिवेआगर येथे सुवर्ण गणेश मूर्ती एका नारळी-फोपळीच्या बागेत सापडली आणि दिवेआगरला पर्यटकांचा ओघ वाढु लागला.महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या इतर प्रांतातुन असंख्य श्रद्धावान गणेश भक्त दर्शना साठी येऊ लागले.

दिवेआगर लगत असलेल्या वेळास गावात दिवेआगर वासियांची भातशेती, आंबा, नारळाच्या बागाही आहेत. रोजगाराचा साधन म्हणून वेळास परिसरातील काही मंडळी रोजगारा साठी दिवेआगरला जात-येत असत.

हे लोक कित्येक वर्षे या खाडीतून होडीने प्रवासी प्रवास करत असत. मात्र अंदाजे २०-२५ वर्ष या खाडीतील होडी वाहतूक काही कारणाने बंद झाल्याने वेळास-दिवेआगर ये-जा प्रवास बंद झाला आणि पाच मिनिटांचा प्रवास पाच कि.मीटरने दूर गेला.शिवाय खर्चिक झाला.राज्य सरकार व पर्यटन विकास खात्याने या गंभीर समस्येचा विचार करावा.

रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे हे या पुलाचा आवर्जून उल्लेख लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सभेतून व पत्रकार परिषदेत करत आले. मात्र आता होत नसल्याने नारिकांच्या पुढे प्रश्न उभा आहे व प्रतीक्षा कायम आहे.

श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे तसेच रोजगार हमी, खारभूमी विकास व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी या महत्वाच्या पूर्वनियोजित पुल होण्यास प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news