Panvel Water Shortage: पनवेलकरांची पाणीटंचाई मिटणार? जांभिवली धरणातून रोज १५ एमएलडी पाणी मिळण्याची शक्यता

महापालिका विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे यांच्याकडून धरणाची पहाणी
Panvel Water Shortage
Panvel Water ShortagePudhari
Published on: 
Updated on: 

पनवेल: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी जलस्रोतांची पाहणी करण्याचा धडाका सुरू ठेवला आहे. तळोजा येथील ओवे धरण, त्या नंतर पनवेल मोर्बी धरण आणि आत्ता जाभिवली येथील धरणाची पाहणी त्यांनी केली आहे.

सुमारे १४८ एकर क्षेत्रफळ असलेल्या या धरणातून दररोज १५ एमएलडी पाणी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, या जलस्रोताचा पनवेल महापालिका क्षेत्राच्या पाणीपुरवठ्यासाठी वापर करता येईल का, याची चाचपणी केली जात असल्याचे त्यांनी सांगीतले.

Panvel Water Shortage
Uran Water Shortage: उरणकरांनो, पाणी जपून वापरा! २७ ऑक्टोबरपासून पाणी कपात; पुढील काळात टंचाईचे संकट

पनवेल शहरासह महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत असताना नागरिकांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पर्यायी जलस्रोतांचा शोध घेण्याची मोहीम अरविंद म्हात्रे यांनी हाती घेतली आहे. यापूर्वी त्यांनी तीन जलस्रोतांची पाहणी केली असून, त्याच मोहिमेअंतर्गत जांभिवली धरणाची पाहणी करून तेथील पाणीसाठा आणि उपलब्धतेच्या शक्यतांचा आढावा घेतला.

Panvel Water Shortage
Chimbhave Dhangarwadi heavy rain: चिंभावे धनगरवाडीत वादळी पावसाचा कहर! ग्रामदैवत भैरी देवीचे मंदिर कोसळले

जांभिवली धरण १९७५ पासून अस्तित्वात आहे. या धरणातून दररोज सुमारे १५ एमएलडी पाणी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे. या पाण्याचा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यासाठी उपयोग झाल्यास सध्याच्या टंचाईवर काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

मात्र, यासाठी पाणी उपलब्धतेची तांत्रिक तपासणी, पाणी वाहून आणण्याची व्यवस्था आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे. महापालिका प्रशासनाशी करणार चर्चा जांभिवली धरणातील पाण्याचा पनवेलच्या पाणीपुरवठ्यासाठी वापर करण्याबाबत महानगरपालिका प्रशासन सकारात्म आहे.

या पाणी वापराबाबत लवकरच प्रशासनाबरोबर चर्चा करण्यात येणार असल्याचे अरविंद म्हात्रे यांनी सांगितले. त्यामुळे जांभिवली धरणाच्या पाण्याची प्रत्यक्ष उपलब्धता आणि त्याचा वापर करण्याची व्यवहार्यता तांत्रिकदृष्ट्या तपासल्यानंतर पुढील निर्णय होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news