Varnai Mata Temple : पांडवकालीन वरणाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

कर्जतमध्ये नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध; निसर्गरम्य परिसरामुळे धार्मिक पर्यटनाला चालना
Varnai Mata Temple
Varnai Mata Temple pudhari photo
Published on: 
Updated on: 

कर्जत : कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील वर्णे, नांगुर्ले आणि तिघर या तीन गावांची ग्रामदेवता असलेल्या वरणाई मातेच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वरणाई मातेच्या दर्शनासाठी कर्जत, खालापूरसह परिसरातील गावांमधून भाविक सहकुटुंब येत आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे प्राचीन मंदिर सध्या श्रद्धा आणि निसर्गसौंदर्याचा संगम ठरत आहे.

वरणाई मातेचे मंदिर पांडवकालीन असल्याची स्थानिकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या मागील डोंगरात प्राचीन लेण्या आणि दगडात कोरलेली पाण्याची टाकी असल्याचे सांगितले जाते. या टाक्यांमध्ये वर्षभर पाणी टिकून राहत असल्याने या परिसराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पांडवांच्या वास्तव्याशी या स्थळाचा संबंध असल्याची आख्यायिका परिसरात प्रचलित आहे.

Varnai Mata Temple
Raigad Illegal Tree Cutting : चाफेवाडी-गावंडवाडीत सागवान वृक्षांची कत्तल

वरणाई माता नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक भक्त देवीसमोर गाऱ्हाणे मांडतात, तर नवस पूर्ण झाल्यानंतर धार्मिक विधी करून देवीचे आभार मानतात. काही भाविक येथे पारंपरिक धार्मिक विधींसाठीही येतात. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसरात भक्तांची वर्दळ वाढली आहे.

दरम्यान, कर्जत-खोपोली महामार्गावरील वर्णे येथील कल्पतरू प्रकल्पातून सुसज्ज रस्त्यातून मंदिरापर्यंत जात येते. मंदिरासमोरील या गृहनिर्माण प्रकल्पाच्या परिसरात सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडत आहे. डोंगर, हिरवाई आणि निसर्गरम्य वातावरणाच्या सान्निध्यात असलेले मंदिर अधिक उठून दिसत आहे.

Varnai Mata Temple
Mumbai Crime : पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला अटक

मात्र, मंदिराची सध्याची अवस्था जीर्ण असल्याने त्याच्या नूतनीकरणाची गरज आहे. अशा परिस्थितीतही पुजारी रमेश देशमुख यांनी भक्तांच्या सहकाऱ्याने मंदिर अधिक सुसज्ज केले आहे. ऐतिहासिक वारसा, धार्मिक श्रद्धा आणि निसर्गसौंदर्य लाभलेल्या वरणाई मातेच्या मंदिराचा नियोजनबद्ध विकास झाल्यास हे स्थळ कर्जत तालुक्यातील महत्त्वाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news