Mumbai Crime : पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला अटक

अटकेनंतर अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
Mumbai Crime
Mumbai Crime pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : पवई येथे राहणार्‍या शबीना मेहमूद मोमीन या महिलेची तिच्या पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना मंगळवारी साडेचारच्या सुमारास पवईतील खालचा तुंगा, केबीएम कंपाऊंड, सुलोचनाबाई चाळीत घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी पती मेहमूद मोमीन (४०) याला पवई पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुलोचनाबाई चाळीत मेहमूद मोमीन हा कुटुंबियांसोबत राहत होता. गेल्या काही दिवसांपासून पत्नी शबीनासोबत क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन वाद होत होते. मंगळवारी सायंकाळी चार वाजता याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. यावेळी मेहमूदने शबीनाची हाताने आणि पायाने गळा आवळून हत्या केली होती. या घटनेनंतर तो प्रचंड घाबरला आणि घरातून पळून गेला.

Mumbai Crime
Mumbai FDA Action : मुंबईत डॉमिनोजसह १७ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलीलद होती. शबीनाला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल नंतर पोलिसांना प्राप्त झाला. त्यात शबीनाची गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले होते.

या घटनेनंतर पोलीस शिपाई चेतन चंद्रकांत कानडे यांच्या तक्रारीवरुन पवई पोलिसांनी मेहमूद मोमीनविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या मेहमूदला काही तासांत पोलिसांनी अटक केली.

Mumbai Crime
Tribal Students | आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला नवी दिशा; नंदुरबारच्या 30 आश्रमशाळांत 'भविष्यातील अधिकारी' परीक्षा संपन्न

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news