Uran Entertainment Facilities : रखडलेल्या नाट्यगृह, मिनी सिनेमागृहाची उरणकरांना २०२७ अखेरपर्यंत प्रतीक्षा

२७ कोटी खर्चाच्या अद्यावत टाऊन हॉलच्या इमारतीचे काम पूर्ण होण्यास नागरिकांना आणखी २० महिने प्रतिक्षा करावी लागणार
Uran Entertainment Facilities
Uran Entertainment Facilitiespudhari photo
Published on: 
Updated on: 

उरण : उरणकरांच्या मनोरंजनाच्या सोयी सुविधांनी परिपूर्ण अशा मागील १० वर्षांपासून रखडत सुरू असलेल्या २७ कोटी खर्चाच्या अद्यावत टाऊन हॉलच्या इमारतीचे काम पूर्ण होण्यास नागरिकांना आणखी २० महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे.

उरणमध्ये करमणुकीचे कोणतेही साधन नाही. ना नाट्यगृह ना सिनेमा हॉल. त्यामुळे नाटक, सिनेमा पाहाण्यासाठी उरणकरांना मुंबई, नवीमुंबई, पनवेल आदी शहरांमध्ये धाव घ्यावी लागते. याआधी उरण शहरात असलेल्या राजीव गांधी सभागृहातील नाट्यगृहात करमणूकीसाठी नाटकाचे प्रयोग केले जात होते. एक हजार प्रेक्षकांच्या क्षमतेच्या या नाट्यगृहात नाटका व्यतिरिक्त इतर विविध प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जात होते.

Uran Entertainment Facilities
Panvel Municipal Corporation : मनपाच्या १११ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

लग्नसराईत हेच नाट्यगृह पाच हजारांच्या भाड्याने घेऊन लग्नसमारंभ स्वस्तात उरकून घेत होते. मात्र उरण न.प.च्या राजीव गांधी टाऊन हॉलची जुनी इमारत वापरासाठी अत्यंत धोकादायक ठरल्याने या इमारतीचा वापर बंद करण्यात आला आहे. उरणकरांसाठी एकमेव असलेले राजीव गांधी हॉलमधील नाट्यगृह बंद पडल्याने करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्याचे काम बंद झाले आहे. त्यामुळे उरणकरांना मागील १० वर्षांपासून करमणूक, मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी आसपासच्या शहरात जावे लागत आहे. यामुळे नाहक वेळ, पैसा वाया जात आहे.

उरणवासियांसाठी उरणमध्येच करमणुकीची सोय उपलब्ध करून देण्यासाठी उरण न.प.ने धोकादायक ठरलेली राजीव गांधी टाऊन हॉलची इमारत पाडून शहरात नवीन अद्यावत इमारतीचे बांधकाम करण्याचे काम सुरू केले आहे. सुमारे १० वर्षांपूर्वी जुन्या १२००० चौ फुटांच्या जागेतच नव्याने उभारण्यात येत असलेल्या बांधण्यासाठी २० कोटी आणि इंटिरिअर डिझायनसाठी ५ कोटी असा २७ कोटी खर्च खर्च अपेक्षित आहे. शासनाकडून निधीही मंजूर करण्यात आलेला आहे.

Uran Entertainment Facilities
Mumbai University : मुंबई विद्यापीठाकडून बौद्ध भन्तेंचा पदव्युत्तर प्रवेश रद्द

२७ कोटी रुपये खर्चाच्या या टाऊनहॉलमध्ये नागरिकांच्या मनोरंजनासाठी ३०० प्रेक्षक क्षमतेचे मिनी थिएटर, नाट्यगृह , लग्न समारंभासाठी सभागृह, रेस्टॉरंट आणि इतर अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच उनपला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी आठ व्यावसायिक गाळेही बांधण्यात येत आहेत. उरण शहरच नव्हे तर परिसरातील लाखो नागरिकांनाही या अद्यावत टाऊन हॉलच्या इमारतीचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा लागुन राहिली आहे. मात्र प्रतिक्षा लागुन राहिलेल्या टाऊन हॉलचे काम मागील १० वर्षांपासून रखडले आहे.या कालावधीत तीन ठेकेदारही बदलले आहेत.मात्र अद्यापही टाऊन हॉलच्या इमारतीचे काम पूर्ण झालेले नाही. मागील ४ वर्षांपासून उनपमध्ये प्रशासकीय कारभार सुरू होता. याचा परिणामही कामाच्या विलंबासाठी कारणीभूत ठरत आहे.

जुन्या १२००० चौ. फुटांच्या जागेतच नव्याने उभारण्यात येत असलेल्या बांधण्यासाठी २० कोटी आणि इंटिरिअर डिझायनसाठी ५ कोटी असा २७ कोटी खर्च खर्च अपेक्षित आहे. शासनाकडून निधीही मंजूर करण्यात आलेला आहे.मात्र विविध तांत्रिक कारणांमुळे राजीव गांधी टाऊन हॉलच्या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास नेता आलेले नाही. आता मात्र अडथळे दूर झाल्याने २०२७ पर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल.

निखिल ढोरे, शहर अभियंता, उरण नगर परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news