

Blackout Causes Death
उरण : उरणच्या सारडे गावातील महिला महादुबाई महादेव माळी (वय 77) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 4 जून रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. उपचारासाठी नेतानाच रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
सारडे येथील महिला महादूबाई माळी ही महिला कालच्या 8 च्या रात्रीच्या सुमारास घरामध्ये एकटीच होती. त्यावेळी सर्वत्र लाईट ही गेली होती. मात्र घराबाहेर पडताना बॅटरी घेतली नव्हती. पायाला तिच्या काहीतरी टोचले असल्याचे तीला जाणवले मात्र कदाचित हा विंचू असावा असे वाटून तीने गावातील डॉक्टरकडे प्राथमिक उपचार घेतले. परंतु काही वेळाने तिला अस्वस्थ जाणवू लागल्याने तिला उपचारासाठी उरणच्या रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला.
सदर महिलेच्या मृत्यूमुळे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र अशा सर्प दंशाची घटना घडू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे. मण्यारचे पिल्लू असल्यामुळे त्याचा दंश या महिलेला जाणवला नसावा असा अंदाज सर्प मित्रांनी व्यक्त केला.
महिला, पुरुष शेतकरी यांनी रात्री अपरात्री बाहेर पडतेवेळी बॅटरीचा वापर करणे गरजेचे आहे. बाहेर पडतेवेळी बूटचा वापर करणे गरजेचे आहे. एखाद्या अडगळीच्या ठिकाणी अनेक दिवसांपासून वस्तू ठेवल्या असतील तर तिथे खात्री करूनच बाहेर काढली पाहिजे. त्यामुळे आपली काळजी घ्या आणि सुरक्षित रहा आणि जर का सर्प दंश झाला असेल तर शासकीय रुग्णालयातच प्रथम पोहचण्याचा प्रयत्न करा असे आवाहन वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेने केले आहे.
सध्या पावसाळा बर्यापैकी सुरुवात झाले आहे. आता या पावसाळ्यात बिळात पाणी जाते आणि साप पाण्याखाली राहत नाहीत. पाण्याखाली साप न राहिल्यामुळे ते बाहेर पडतात आणि मानवी वस्तीत अडगळीच्या ठिकाणी येतात त्यामुळे पावसाळ्याच्या हंगामात सर्प दंशाच्या घटना जास्त घडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.