

More than one thousand teacher posts are vacant in Raigad.
अलिबाग : पुढारी वृत्तसेवा
रायगड जिल्हयात अडीच हज ाराहून अधिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये मुख्याध्यापक, उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक असे मिळून सहा हजार २३१ पदे मंजूर आहेत. यात प्रत्यक्षात पाच हजार ५१३ पदे भरलेली आहेत. जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्तपदांची टक्केवारी १७.३ इतकी आहे.
मुख्याध्यापकांची १११ पदे मंजूर असताना केवळ ३२ पदे भरलेली आहेत. महाड, माणगाव, म्हसळा मुरूड, पेण, रोहा, श्रीवर्धन तळा या आठ तालुक्यात एकही मुख्याध्यापक कार्यरत नाही. एकीकडे खाजगी आणि इंग्रजी शाळांचे आक्रमण सुरू असताना दुसरीकडे सरकारी शाळांमधील शिक्षकांची कमतरता मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर परीणाम करणारे आहे. रायगड जिल्हयात नवीन इंग्रजी माध्यमांची संख्या दरवर्षी वाढते आहे.
शहराबरोचरच गावागावातील २७३ पालकांचा कल इंग्रजी मध्यम शाळांकडे वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी होवू लागली आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांची कमतरता भरून काढताना शिक्षण विभागाची ओढताण होते आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी शासनाने सेवानिवृत्त मानधन तत्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळा-लेला नाही. पटसंख्या कमी झाल्याने अनेक दोन शिक्षकी शाळा एकशिक्षकी झाल्या आहेत.
जिल्हा परीषदेच्या शाळांचा विस्तार मोठा असल्याने विद्यार्थी गुणवत् ोच्या अनुषंगाने केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परीषद शाळांना भेटी देणे आवश्यक असते. परंतु ही पदे देखील मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. केंद्र प्रमुखांची २२८ पदे मंजूर आहेत. त्यातील ५० टक्के म्हणजे ११४ पदे स्पर्धा परीक्षेतून भरायची आहे. परंतु मागील दोन वर्षात स्पर्धा परीक्षाच झालेली नाही.
प्राथमिक शाळांमधील रिक्तपदे
मंजूर पदे
१११
भरलेली पदे
३२
मुख्याध्यापक
उपशिक्षक
५१८४
९३६
रिक्त पदे
८३
पदवीधर
४५२०
पद
७२१
२७३