Uran Neral railway safety : उरण-नेरळ रेल्वे मार्गावर प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

22 महिन्यानंतरही सीसीटीव्ही यंत्रणा नाही,स्थानकात गैरसोयी
Uran Neral railway safety
उरण-नेरळ रेल्वे मार्गावर प्रवाशांची सुरक्षा धोक्यातpudhari photo
Published on
Updated on

उरण : उरण ते नेरुळ ,बेलापूर ही लोकल सुरू होऊन 22 महिने झाले आहेत. मात्र या स्थानकांवर आणि स्थानक परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. या मार्गावरील लोकलच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या वेळी येणाऱ्या नोकरदार महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

उरण ते नेरुळ - बेलापूर मार्गावरील पाच स्थानकांच्या परिसरात गेल्या काही दिवसांत अनेक प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत. या मार्गावर महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करीत आहेत. उरण ते खारकोपर दरम्यानच्या उरण, द्रोणागिरी, न्हावा शेवा आणि शेमटीखार ही स्थानके आहेत. आता यात गव्हाण स्थानकाची भर पडणार आहे. या स्थानकाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सिडको की रेल्वेची ही समस्या आहे. मात्र नवी मुंबईतील खारकोपरपासून पुढील स्थानकांच्या ठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही हे मध्य रेल्वेकडून बसविण्यात आले आहेत. मात्र उरणच्या लोकल मार्गावरील स्थानकांना सीसीटीव्हीची प्रतीक्षा आजही कायम आहे.

Uran Neral railway safety
ONGC red zone fishing : ओएनजीसीच्या रेड झोनमध्ये मासेमारी

चोऱ्याही वाढल्या

स्थानक परिसरात अनेकदा चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर दुसरीकडे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. उरण स्थानकाच्या प्रवेशद्वारावर अंधार पडला होता. यातील द्रोणागिरी न्हावा शेवा तसेच रोमटीखार या स्थानक परिसरात रात्रीच्या वेळीही वर्दळ कमी असते. त्यामुळे उरण लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात यावेत अशी मागणी आहे.

Uran Neral railway safety
Diva Chiplun MEMU train service : दिवा-चिपळूण मेमू लोकल सेवा प्रवाशांच्या सेवेत कायमस्वरूपी रुजू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news