

उरण ः अरबी समुद्रातील ओएनजीसी या ऑफशोअर प्लॅटफॉर्मभोवती असलेल्या प्रतिबंधित सुरक्षा क्षेत्रात 2 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल यलो गेट पोलिसांनी सहा अज्ञात मासेमारी बोट चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. कारवाई केलेल्या या बोटींमध्ये काही बोटी या करंजा, उरण परिसरातील असल्याची माहिती आहे.
सागरी सुरक्षेसाठी समन्वय साधणाऱ्या तक्रारदाराने एफआयआर मध्ये म्हटले आहे की केवळ नौदल, तटरक्षक दल आणि सागरी पोलिस जहाजांना प्रतिबंधित परिघात परवानगी आहे. नौदलाच्या ऑफशोअर डिफेन्स ॲडव्हायझरी ग्रुपने ओएनजीसी ला ईमेलद्वारे कळवले की नियमित गस्ती दरम्यान, मासेमारी जहाजे गंगा मैया 5. कलावती शक्ती, देवयानी, एमएफबी श्री मथु मरियम्मा, श्री ब्रह्ममूर्ती छाया आणि महालक्ष्मी माऊली प्रतिबंधित झोनमध्ये कार्यरत असल्याचे दिसले. होते . मत्स्यव्यवसाय विभागाला पूर्व लेखी इशारा , निर्देश देऊनही, प्रतिष्ठानांजवळ या बोटी मासेमारी करताना पकडल्या.
500 मीटर प्रतिबंधित क्षेत्र
ओएनजीसीचे मुख्य व्यवस्थापक (सुरक्षा) मुबीन अहमद (49) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने वारंवार प्रवेश करून सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले. ओएनजीसी ऑफशोअर प्लॅटफॉर्मजवळील 500 मीटरचा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत आहे. 12 जून रोजीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार हे निर्बंध अनिवार्य करण्यात आले आहेत.