

चिल्हे ः ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या धारा धो धो कोसळल्या सोसाट्याच्या वारा आणि विजांचा कडकडाट त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेले धानाची नासाडी झाली ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि धान कापणीच्या वेळेवरच पाऊस झाल्याने खूप मोठ्या प्रमाणावर बळीराजाचे नुकसान झाले आहे बळीराजाची दिवाळीपहाट ही आपल्या शेतातील धान वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
बळीराजाचा नातं हे थेट शेतातील धानाच्या पिकांमध्ये आहे त्याच्या कुटुंबीयांची मुलाबाळांची आनंदाची दिवाळी ही शेतात रावण्यांजोग काय आहे पावसाच्या भीतीपोटी उरले सुरलेले धान पावसाची विश्रांती मिळताच पदरात पाडून घेण्यासाठी मेहतीने प्रयत्न करत असताना दिसून येत आहे.
परतीच्या पावसामुळे दाणेदार कणस मोत्यासारखे धान जमीनदोस्त झाल्याने हातातोंडांशी आलेला घास निसर्गाच्या कोपामुळे हिरावून जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतकरी वर्गात मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तर युवा पिढीचा शेती करण्यासाठी प्रयत्न यावर येत असलेल्या संकट यानेच खचून गेला आहे. बळीराजाची दिवाळी पुन्हा एकदा शेतातच सुरू झाली असून, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
विशेषतः रायगड आणि कोकणासह अनेक भागांत विखुरलेल्या परतीच्या पावसाने कापणीसाठी तयार ठेवलेले धान भिजून चिखलात बसले आहे. त्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेण्याची शक्यता नाही तर एकूणच हिरावला गेला आहे. पाऊस नेमक्याच दिवाळीच्या तोंडावर वादळ वाऱ्यासह पडला. त्यामुळे शेतातील पीक पूर्णतः झोपले तर काहीनी कापणी केलेले आणि ठेवलेले भाताचे गठ्ठे पुन्हा भिजले, पाणी साचल्याने पिक घटण्याची शक्यता आहे.
ओला दुष्काळ जाहीर करा
त्यामुळे यावर्षी में महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला त्यामुळे उन्हाळी पिके देखील त्या मोसमी पावसाने नासवली तरी देखील ताट मानेने पुन्हा खरपाच्या लागवडीसाठी सज्ज होऊन नव्याने लागवड केली त्यावर देखील अनेक प्रकारचे संकट आले आणि त्यातून उरलेसुरले पीक यावर आता परतीच्या पावसाची कुराड असल्याने अक्षरशः शेतकरी राजा चिंतेत सापडला असून त्यावर राज्य सरकाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रह मागणी रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.