Third Mumbai Ganpati Decoration: गणेशोत्सव देखाव्यातून तिसरी मुंबईविरोधात जनजागृती

शहरी आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शवून शेती जमीन न विकण्याचे केले आवाहन
Third Mumbai Ganpati Decoration
Third Mumbai Ganpati DecorationPudhari
Published on
Updated on

जेएनपीए: राज्य सरकारच्या तिसरी मुंबई विरोधात उरण पनवेल पेण तालुक्यातील १२४ गावातून प्रखर विरोध केला जात आहे. सरकारने भूसंपादन प्रक्रिया सुरू केल्यापासून या विरोधकाला अधिक गती मिळाली आहे.

एकीकडे सरकार तिसरी मुंबईचा हट्ट कायम ठेवत आहे तर दुसरीकडे शेतकरी संघटना १२४ गाव पिंजून काढत विरोधाची धार वाढवत आहेत. आता हा विरोध गणपती देखाव्यातून पाहायला मिळत आहे. याद्वारे तिसरी मुंबईला कोणत्याही प्रकारे जमीन न देण्याची व तरुण पिढीला या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.

Third Mumbai Ganpati Decoration
Karjat Trekking Rescue: मुसळधार पाऊस, दाट धुक्यात अडकलेल्या तीन ट्रेकर्सची सुखरूप सुटका

एमएमआरडीए केएससी नवनगर तिसरी मुंबई विरोधी शेतकरी समिती रायगडचे सरचिटणीस रूपेश पाटील यांनी गणपती देखाव्यातून शहरी आणि ग्रामीण जीवनातील फरक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

एक शेतकरी गणपती बाप्पाला आवाहन करत असून तिसरी मुंबईतून हद्दपार झालो तर तुझे सण आणि उत्सव कसे साजरे करणार अशी आर्त विनवणी करत आहे. मुंबई नवी मुंबईत स्थानिक आगरी कोळी कराडी कुणबी समाज भूमिहीन होऊन उध्वस्त झाला असून उपऱ्यांनी हातपाय पसरले आहेत.

त्यांनी स्थानिकांचे सामाजिक व राजकीय स्थान धोक्यात आणले आहे. शहरांमुळे स्थानिक समाजसंस्कृती बोलीभाषा व्यवसाय रोजगार यावर परप्रांतीयांचे आक्रमण झाले आहे. शहरातील सिमेंटची जंगले, टॉवर संस्कृतीमुळे नागरी सुविधावर ताण पडतो. याशिवाय गुन्हेगारी फोफावली असल्याचे मुंबईत नवी मुंबईत बघायला मिळते. श्रीमंतांना मोकळा श्वास देण्यासाठी तिसरी मुंबई उभारण्याच्या सरकारी धोरणाने ग्रामीण शेतकरी उध्वस्त होणार आहे.

उदरनिर्वाहाची शेती काढून त्यांचा श्वास कोंडवणारी कृती सरकारची असून मुख्यमंत्री फडणवीस आपल्या जन्मभूमी नागपूरात दुसरे नागपूर तिसरे नागपूर उभे करतील का असा प्रश्न केला जात आहे. या देखाव्यातून शेती जमीन घरे आणि गावे वाचवण्यासाठीच्या लढाईत जेन झी आणि जेन अल्फा पिढीने आपल्या भविष्य डोळ्यासमोर ठेवून उतरण्याचे आवाहन केलं आहे.

तिसऱ्या मुंबई विरोधात सहभागी होण्याची सुबुद्धी गणपती बाप्पाने शेतकरी आणि युवा पिढीला द्यावी अशीही साद घालण्यात आली आहे. सेझ आंदोलनातील प्रमुख मार्गदर्शक दिवंगत माजी न्यायमूर्ती पी बी सावंत, लोकनेते दत्ता पाटील, कॉम्रेड विलास सोनावणे यांचे स्मरण करण्यात आले आहे.

Third Mumbai Ganpati Decoration
Raigad Industrial Land: शेतजमिनी खरेदी केल्या पण 15 वर्षानंतरही उद्योग उभारलाच नाही; दीड हजार हेक्टर जमीन शासनजमा होणार?

याशिवाय सेझ आंदोलनातील मार्गदर्शक आणि तिसरी मुंबई विरोधी लढ्याचे प्रमुख मार्गदर्शक माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनाही देखाव्यात स्थान दिले आहे. तिसरी मुंबई विरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्याला महाराष्ट्रातील अनेक माहिती संदर्भाची कात्रणे देखील देखाव्यात मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news