किल्ले रायगडवरील पायरी मार्ग ३१ जुलै पर्यंत बंद राहणार

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!
The step route at Fort Raigad will remain closed till 31st July
किल्ले रायगडवर जाणारा पायरी मार्ग तसेच रोपवे ३१ जुलै पर्यंत राहणार बंद File Photo
Published on
Updated on

रायगड : नाते इलियास ढोकले

मागील काही दिवसांपासून महाड परिसरात शासकीय वेधशाळा, स्थानिक प्रशासन, पुरातत्व विभागामार्फत घेण्यात आलेल्या सूचनांचा विचार करून रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी किल्ले रायगडवर जाणारा पायरी मार्ग 31 जुलै पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

The step route at Fort Raigad will remain closed till 31st July
IAS Pooja Khedkar| रुबाब दाखवणाऱ्या पूजा खेडकरांचा अहवाल मागविला

यासंदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलेल्या आदेशामध्ये किल्ले रायगड परिसरात रविवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने निर्माण झालेली स्थिती व या परिसरातील असणारी अपघातांची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्याबाबत प्राधान्याने विचार करून ही किल्‍ले रायगड पायरी मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. हा बंदचा कालावधी 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आला असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.

The step route at Fort Raigad will remain closed till 31st July
Mumbai Rains | मुंबईत पुन्हा धुवांधार! ऑरेंज अलर्ट जारी, पुढील ३ ते ४ तास महत्त्वाचे

वेधशाळेमार्फत आगामी काळात रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. हे लक्षात घेऊन तसेच पायरी मार्गावर अपघाताची शक्यता वर्तविण्यात आल्याने किल्ल्यावर येणाऱ्या हजारो शिवभक्त पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्‍याचे या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान किल्ले रायगडावर चित्त दरवाजा व नाणे दरवाजा येथे स्थानिक पोलिसांकडून योग्य ती काळजी घेतली आहे. शिवभक्त गडावर जाणार नाहीत यासाठी बॅरिगेटिंग करावी असेही या आदेशामध्ये सुचविण्यात आले आहे.

The step route at Fort Raigad will remain closed till 31st July
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर

दरम्यान किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग बंद झाला असला तरीही शासनाने रोपवे प्रशासनाला त्यांची यंत्रणा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे गडावर जाण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news