IAS Pooja Khedkar| रुबाब दाखवणाऱ्या पूजा खेडकरांचा अहवाल मागविला

जिल्हाधिकाऱ्यांपेक्षाही जास्त रुवाब दाखवणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्या निवडीला यूपीएससीनेही आव्हान दिले आहे.
IAS officer Pooja Khedkar
रुबाब दाखवणाऱ्या पूजा खेडकरांचा अहवाल मागविलाPudhari News Network

लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनने महाराष्ट्र सरकारकडून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आणि रुवाब दाखवणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्याबद्दल सविस्तर अहवाल मागवला असल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांपेक्षाही जास्त रुवाब दाखवणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्या निवडीला यूपीएससीनेही आव्हान दिले आहे.

IAS officer Pooja Khedkar
नेपाळ : त्रिशूली नदीत भूस्खलनाने २ बस वाहून गेल्या, ६३ बेपत्ता; शोध कार्य सुरु

खेडकरांच्या निवडीला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणमध्ये देखील आव्हान दिले होते. त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने पूजा खेडकरांविरोधात निर्णय दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या विरोधात निर्णय देऊनही त्यांचे एमआरआय प्रमाणपत्र स्वीकारण्यात आले, ज्यामुळे त्यांची आयएएस नियुक्ती निश्चित झाली.

अपंगत्वाच्या दाव्याव्यतिरिक्त, पूजा खेडकरच्या ओबीसी नॉन क्रिमी लेयर दर्जाच्या दाव्यांमध्येही विसंगती आढळून आली. केंद्र सरकारकडून चौकशी समिती शारीरिक अंपगत्वाचा दाखला आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) प्रमाणपत्र मिळवून केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीविक्षाधिन (प्रोबेशनरी) डॉ. पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारने एक सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी पूजा यांच्या अपंगत्वाची चौकशी करणार आहेत. ओबीसी प्रमाणपत्र, अपंगत्व दाखला यामुळे खेडकर यांची नियुक्तीच वादाच्या भोवऱ्यात आहे.

IAS officer Pooja Khedkar
Mumbai Rains | मुंबईत पुन्हा धुवांधार! ऑरेंज अलर्ट जारी, पुढील ३ ते ४ तास महत्त्वाचे

माध्यम प्रतिनिधींना उद्धट वागणूक

पूजा खेडकर ह्या पुण्यात राहत असलेल्या घरी माध्यम प्रतिनिधी पोहचल्यानंतर वार्तांकन करत असताना घरातील एका महिलेने माध्यम प्रतिनिधींना हटकले. यावेळी त्यांच्याकडील कॅमेऱ्याचे नुकसान करण्याचाही प्रयत्न संबंधित महिलेने केला, मात्र जेव्हा पोलिस त्यांच्या घरी नोटीस बजावण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांना त्यांच्या घरी कोणीही आढळून आले नाही.

एवढी मालमत्ता आली कशी?

पूजा खेडकर यांच्या स्वतःच्या नावावर १७ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही जमिनीसुद्धा आहेत. जर इतक्या मोठ्या प्रमाणात या खेडकर कुटुंबीयांच्या नावावर संपत्ती जमा आहे, तर ही संपत्ती या खेडकर कुटुंबीयांनी कशी मिळवली? पूजा खेडकर यांचे वडील सरकारी नोकर होते. त्यांचे आजोबादेखील अधिकारी होते आणि सरकारी नोकरीमध्ये राहून या कुटुंबांनी एवढी मालमत्ता कशी मिळवली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कुटुंबीयांच्या मालकीची जर इतकी मालमत्ता आहे तर प्रामाणिकपणे अभ्यास करून यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका होतकरू विद्याथ्यांची संधी या खेडकर कुटुंबीयांनी हिरावून घेतली आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतो.

IAS officer Pooja Khedkar
Valmiki Corporation scam : काँग्रेस नेते बी नागेंद्रना ईडीने ताब्यात घेतले

... अन्यथा गाडी जप्तीचीही कारवाई

आम्ही दोन ते तीन वेळा पुजा खेडकर यांच्या घरी समजपत्र देण्यास गेलो होतो. परंतु, त्यांच्या घरी कोणीही नसल्याचे आढळले. त्यांच्या कारवर २६ हजार ५०० थकीत दंड आहे. मोटार वाहन अधिनियमान्वये (मोटार व्हेईकल क्ट १७७) खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांना समजपत्र बजाबता आले नसले तरी त्यांना व्हॉट्स अॅपद्वारे ही समजपत्रवजा नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यांचा प्रतिसाद न मिळाल्यास कोर्टाच्या आदेशाने त्यांची गाडी जप्त करण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाहतूक विभागात वाहन सादर करा

  • प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांचे समजपत्र वाहतूक नियमभंग प्रकरणात २६ हजार ५०० रुपयांचा थकीत दंड

भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी महागड्या कारवर लाल दिव्याचा बापर केला आहे, तसेच त्यांच्या कारवर वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी त्यांना पुणे पोलिसांनी समजपत्र काढले आहे. समजपत्रात त्यांना त्यांचे वाहन सर्व कागदपत्रांसह चतुः शृंगी विभागात सादर करण्यास सांगितले आहे.

खेडकर यांनी कारवर लाल दिवा लावल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार बाणेर येथील त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी चतुः शृंगी पोलिसांचे पथक पोहोचले. पोलिसांचे पथक बंगल्यात पोहोचले. तेव्हा बंगल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी खेडकर कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. खेडकर यांच्या बंगल्यात जाऊन पोलिसांनी पाहणी केली. तेव्हा बंगल्यात कोणी नसल्याने कारवाई पूर्ण झाली नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news