पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर

विविध प्रकल्पांचे करणार उद्घाटन
Prime Minister Narendra Modi will visit Mumbai tomorrow
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर येत असून, विविध प्रकल्प ते राष्ट्राला समर्पित करतील आणि इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या एका टॉवरचे उद्घाटनही करणार आहेत. Narendra Modi
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर येत असून, विविध प्रकल्प ते राष्ट्राला समर्पित करतील आणि इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या एका टॉवरचे उद्घाटनही करणार आहेत. विशेष करून मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे.

गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे होणाऱ्या या सोहळ्यातूनच पंतप्रधान मोदी मुंबईतील विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील. या सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय सामाजिक न्याय आणि हक्क राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित राहतील.

Prime Minister Narendra Modi will visit Mumbai tomorrow
Ambani Wedding : आज अंबानी यांच्या घरी नेत्रदीपक विवाह सोहळा

सायंकाळी सात वाजता इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या एका टॉवरचे उद्घाटन करणार आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या विवाहाचा स्वागत समारंभ शनिवारी आहे. पंतप्रधानांच्या अधिकृत दौऱ्यात या कार्यक्रमाचा समावेश नसला, तरी ते या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी चर्चा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news