रायगड किल्ल्याच्या टकमकी आदिवासीवाडी पासून पाचशे मीटर अंतरावर दरड कोसळली!

आदिवासी परिसरात कोणत्याही प्रकारची हानी नाही
Landslide In Raigad
रायगडमध्ये कोसळलेली दरडPudhari Photo
Published on
Updated on

रायगड : नाते इलियास ढोकले

किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या निजामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत आदिवासी वाडी पासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर कड्यावरून एक मोठी दरड कोसळली. ही घटना बुधवारी (दि.7)एक वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून प्राप्त झाली असून या परिसरातील आदिवासी बांधवांना कोणतीही हानी नसल्याची माहिती तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली आहे.

Landslide In Raigad
Nashik Manjargaon Landslide : मांजरगाव रस्त्यावर दरड कोसळली

दरम्यान याबाबत महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांच्याशी संपर्क साधून कोसळलेल्या या दरडी विषयी माहिती घेतली. ही दरड मोठी आहे, पण त्या ठिकाणापासून वस्ती लांब असल्याने कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा पोहोचली पोहचली नाही. तसेच तलाठी आणि कोतवाल यांनी घटनास्थळी पाठवले असल्याचे स्पष्ट केले.

Landslide In Raigad
Nashik | कसारा घाटातील रेल्वे बोगद्या बाहेर दरड कोसळली, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली !

दरम्यान या संदर्भात ग्रामसेवक व्हि.डी .जाधव यांनी दैनिक पुढारीशी बोलताना या परिसरात दोन आदिवासी वाड्यांमधून सुमारे 70 ते 75 कुटुंब मिळून 300 जण राहत असल्याची माहिती दिली. या आदिवासी वाडींमध्ये जगताप, जाधव ,वाघमारे कुटुंब राहत असून वरच्या वाडीतील 4 कुटुंबांना दक्षतेचा भाग म्हणून सुरक्षित ठिकाणी खालच्या वाडीमध्ये घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले.

चरच्या वाडीतील ज्या ग्रामस्थांना खाली आणण्यात आला आहे त्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात येईल असे ग्रामसेवक जाधव यांनी स्पष्ट केले. तसेच स्थानिक ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे सूचना देण्यात आली असून शासकीय यंत्रणा दक्ष असल्याची माहिती ग्रामसेवक व्हि. डी. जाधव तसेच तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली आहे.

Landslide In Raigad
महाबळेश्वरमध्ये उच्चांकी पाऊस; दरड कोसळली

आदिवासी वाडी मधील 16 जण निजामपूर येथे स्थलांतरित

निजामपूर आदिवासी वाडीच्या पाचशे मीटर अंतरावर झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेनंतर शासनाने वरच्या वाडीतील सर्वश्री काटकर जाधव व पवार या तीन कुटुंबातील 16 जणांना निजामपूर येथे सुरक्षित स्थळी स्थलांतरित केल्याची माहिती येथील ग्रामसेवक व्हि.डी. जाधव यांच्याकडून प्राप्त झाली आहे. या सर्वांना निजामपूर येथील सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news