Tadgola fruit : वाढत्या ऊन्हामुळे पर्यटकांची ताडगोळ्यांना पसंती

आरोग्यासाठी ठरतोय परिणामकारक; ताडगोळे विक्रीतून स्थानिकांना मिळतोय रोजगार
Tadgola fruit
वाढत्या ऊन्हामुळे पर्यटकांची ताडगोळ्यांना पसंतीpudhari photo
Published on
Updated on

रेवदंडा : वाढत्या उन्हाळ्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी ताडगोळ्यांना मागणी वाढत आहेत. अलिबाग तालुक्यातील चौल आणि सासवणे परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. सध्या चौलमधील ताडगोळे पर्यटकांची खास पसंती असून मोठी मागणी ऐन उन्हाळयात असते. चौल परिसरात ताडाची असंख्य झाडे असून ताडगोळे विक्रीतून मोठे उत्पत्र स्थानिकांना मिळत आहे.

ऐन उन्हाळ्याचे दिवसात ताडगोळे थंडावा म्हणून पसंतीचे असते. त्यामुळेच मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरातून तसेच परिसरातून आलेले पर्यटक तसेच स्थानिकवर्ग ताडगोळे खरेदी करत असल्याचे चित्र रेवदंडा-चौल बाजारपेठेत दिसते. चौलमध्ये नारळ पोफळीच्या बागेसह ताडाची झाडे सुध्दा विपुल असून त्याला येणाऱ्या नारळासारख्या फळांना ताडगोळे म्हणतात. या फळांतला गर पाणीदार व चवदार असून उंच उंच ताडाच्या झाडावर चढून काढण्याचा व फळांतील गर काढण्यास कस लागतो.

Tadgola fruit
Dam projects delay : धरणांची कामे रखडल्यने शासनावर कोट्यवधी बोजा वाढणार

उन्हाळयात येत असलेल्या ताडगोळयांना बाजारात चांगली मागणी असते. उन्हाळयाचे दिवसात अंगाची लाही लाही होत असताना नैसर्गिक थंडावा देणारे ताडगोळे शरिरातील पाण्याचे प्रमाण टिकवून धरतात. अंगातील उष्णता आरोग्यास लाभदायी कृत्रिक थंडाव्यापेक्षा ताडगोळयांसारखा नैसर्गिक उपाय केव्हाही आरोग्यासाठी चांगलाच परिणामकारक ठरतो. ज्यांना वजन घटवायचे असेल त्यांच्यासाठी या फळाचे सेवन उत्तम आहे. या फळाच्या गरामुळे तसेच फळातील रसामुळे भूक शमविण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होत नाही. ज्यांना लिव्हरच्या संबंधित काही विकार असतील त्यांचेसाठी ताडगोळयांचे सेवन उपयुक्त आहे.

कमी करणाऱ्या ताडगोळयांचे आयुर्वेदातही अनेक औषधी उपयोग सांगितले आहेत. ताडगोळे हे फळ ठराविक ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळयात उपलब्ध असणारे फळ आहे. यांची चव काहीशी शाहळयांतील मलईसारखी लागत असून चवीला हे फळ फारच मधूर असते. इंग्रजी भाषेत आईस ॲपल म्हणून ओळखले जाणारे फळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी असल्याचे म्हटले जाते.

या फळाच्या सेवनाने शरिराला आवश्यक असलेले क्षार व इतर पोषक तत्वे संतुलित मात्रेमध्ये मिळत असतात. ज्यांना त्वचेवर उन्हाळयात सतत पुरळ येत असेल, तसेच ज्यांना या दिवसात चेहऱ्यावर मुरूमे येत असतील त्यांच्यासाठी या फळाचे सेवन उत्तम आहे. या फळामध्ये कर्करोगारी प्रतिरोधी तत्वे असून विशेषतः महिलांमध्ये आढळणाऱ्या स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी या फळाचे सेवन उत्तम मानले जाते.

Tadgola fruit
Bhiwandi water theft : भिवंडीत साडेपाच लाखांची पाणीचोरी उघड

वजन घटविण्यासाठी या फळाचे सेवन उत्तम

ज्यांना वजन घटवायचे असेल त्याच्यासाठी या फळाचे सेवन उत्तम आहे. या फळाच्या गरामुळे तसेच फळातील रसामुळे भुक शमविण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होत नाही. ज्याना लिव्हरच्या संबंधीत काही विकार असतील त्याचेसाठी ताडगोळयांचे सेवन उपयुक्त आहे. या फळामध्ये पोटॅशियम मुबक मात्रेमध्ये असून लिव्हरमध्ये साठलेले घातक, विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. या फळाच्या सेवनाने शरिराला श्रम करण्याची आवश्यक ताकद व उर्जा मिळते.

या फळाच्या सेवनाने शरिरातील ग्लुकोजची पातळी वाढत असल्याने दिवसभरासाठी लागण-ताकद या फळाच्या सेवनातून मिळत असते. या या गुणकारी ताडगोळे फळांची फार मोठी मागणी उन्हाळयात पर्यटक व स्थानिक वर्ग करत असतो. चौल परिसरात आर्थिक उत्पन्न देणारे ताडवृक्ष असंख्य संख्येने असून या ताडाच्या वृक्षाच्या लागवड करणे दिवसेंदिवस गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news