Sunil Tatkare : महाडच्या सर्वांगिण विकासाचा निर्धार­

खा.सुनील तटकरे यांची ग्वाही, राष्ट्रवादी, भाजपचा शहरासाठी संयुक्त जाहीरनामा
Sunil Tatkare
सुनील तटकरे
Published on
Updated on

महाडः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात महानगर परिषदेची निवडणूक होत असून यांनी निवडणुकीसाठी शहरातील नागरिकांना अभिप्रेत असणारा शहराचा सर्वांगिण विकास करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप युतीने केलेला आहे. शहराचे सुशोभिकरण, 24 तास मुबलक पाणीपुरवठा व कौशल्य विकास केंद्र यासह अन्य बाबींची पूर्तता करणारा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, प्रदेश सरचिटणीस हनुमंत जगताप व भाजपाचे महाड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बिपिन महामुंणकर व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदेश कलमकर आदींच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.

Sunil Tatkare
Sunil Tatkare : दक्षिण रायगडात माणगाव हे विकासाचे मॉडेल ठरेल !

यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी यापूर्वी पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे झालेले आहेत आणि नंतरच्या कालावधीमध्ये करण्याच्या संदर्भामध्ये विशेष करून महाड मधील घनकचऱ्याचे व्यवस्थापन, ग्रामदैवत असलेल्या वीरेश्वर मंदिराच्या प्रशासकीय काळामध्ये कोणाच्या हट्टाशामुळे रखडलेले सुशोभीकरण हे जलद गतीने त्या ठिकाणी पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले

मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी जलस्त्रोत निर्माण करत शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा शहरामध्ये 24 तास उपलब्ध करण्याच्या काम होईल, रोह्याला जसे नदी संवर्धन केले त्याच धर्तीवर (रोह्याला गॅबियन धर्ती) संवर्धन व्हायला आहे असे या ठिकाणी निश्चितपणे केले जाईल. शहरांमध्ये गृहनिर्माण संस्था खूप मोठ्या प्रमाणावर आहेत त्याच्या अंतर्गत पायाभूत सुविधा त्या मी वेगवेगळ्या निधीतून त्याठिकाणी उपलब्ध केल्यात भाजपाचे बिपिन दादांनी व स्नेहल दीदीने मला मधल्या कलावधीमध्ये शहरातील सुशोभीकरणाबाबत विनंती केली होती त्याच्यामुळे त्याच्या साठी सुद्धा वेगळा वेगळा निधी त्याठिकाणी उपलब्ध करणार आहोत आणि मग इतरही बाबी या ठिकाणी दिलेले आहेत,असेआश्वासन यावेळी दिले.

Sunil Tatkare
Sunil Tatkare : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news