Raigad ZP election: सुधागडमध्ये ‘हायटेक’ निवडणूक प्रचाराचा जोर; सोशल मीडियावरूनच रंगतोय सत्तासंघर्ष

व्हॉट्सॲप-फेसबुकवर प्रचाराचा धुरळा; महायुती विरुद्ध शेकाप-सेना आघाडीची प्रतिष्ठेची लढत
Raigad ZP election
Raigad ZP electionpudhari photo
Published on
Updated on

पाली : शरद निकुंभ

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, यंदाच्या निवडणुकीत गावा गावातील राजकारणाला ‌‘हायटेक‌’ प्रचाराची जोड मिळाल्याचे चित्र आहे. घरोघरी भेटी, प्रचार फेऱ्या आणि छोट्या सभा सुरू असतानाच, समाज माध्यमांवरून प्रचाराचा धुरळा उडत आहे. व्हॉट्स ॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम च्या माध्यमातून रॅली, प्रचार दौरे, विकासकामांचा लेखाजोखा आणि भावी अजेंडा डिजिटल स्वरूपात मतदारांपर्यंत पोहोचवला जात आहे.

Raigad ZP election
Diveagar Road Accidents: श्रीवर्धन–दिवेआगर मार्गावर अपघातांची मालिका; पर्यटकांच्या बेदरकारपणामुळे स्थानिकांमध्ये भीती

सुधागड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन जागांसाठी 4 उमेदवार, तर पंचायत समितीच्या चार जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याने प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्व मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे कठीण असल्याने उमेदवारांनी डिजिटल बॅनर, व्हिडिओ आणि संदेशांचा आधार घेतला आहे. सत्ताधारी आपल्या कार्यकाळातील कामगिरी आणि राबवलेल्या योजनांचा प्रचार करत आहेत, तर विरोधक समाजमाध्यमांतून सत्ताधाऱ्यांच्या उणिवा, अपूर्ण कामे आणि कथित भ्रष्टाचारावर टीकास्त्र सोडत आहेत.

मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरांत कामानिमित्त गेलेले मतदार अनेक गटांत निर्णायक ठरणार आहेत. या मतदारांशी सातत्याने संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी साधन ठरत असून, शुभेच्छा संदेश, गावच्या घडामोडी आणि मतदानासाठी गावात येण्याची भावनिक साद उमेदवारांकडून घातली जात आहे.

Raigad ZP election
Zero Tillage Val Cultivation: शून्य मशागत तंत्राची कमाल; पेणच्या गागोदे गावात 40 एकरांवर बहरले उन्हाळी वाल

मतदार संघातील उमेदवार

जांभूळपाडा गटात भाजपच्या नीलिमा धैर्यशील पाटील आणि शिवसेना (शिंदे गट)च्या शर्मिला शरद बोडके यांच्यात अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची लढत रंगली असून आहे. सुधागड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप,रिपां महायुती विरुद्ध शेकाप, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना ( ठाकरे गट) अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. राबगाव आणि जांभूळपाडा गटांत मुख्य चुरस रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राबगाव गटात भाजपचे चंद्रकांत कृष्णा वारगुडा आणि शेतकरी कामगार पक्षाचे काशिनाथ ताया हंबीर रिंगणात आहेत. राबगाव गण मध्ये भाजपच्या सुनीता किसन लेंडी आणि शेकापच्या मनीषा भरत डोके यांच्यात थेट सामना होत आहे. अडुळसे गण क्र. 40 (सर्वसाधारण) येथे मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यात तिहेरी लढत आहे.

Raigad ZP election
Ulwe Police Attack: अमली पदार्थ कारवाईला गेलेल्या मुंबई पोलिसांवर उलव्यात प्राणघातक हल्ला

जांभूळपाडा गट क्र. 19 (सर्वसाधारण महिला) मध्ये भाजपच्या नीलिमा धैर्यशील पाटील आणि शिवसेना (शिंदे गट)च्या शर्मिला शरद बोडके आमनेसामने आहेत. परळी गण क्र. 37 (ना.मा.प्र. महिला) येथे भाजपच्या सुनंदा विठ्ठल सिनकर आणि शिवसेना (उबाठा)च्या प्रणिता राजेश परदेशी यांच्यात लढत होत आहे. जांभूळपाडा गण क्र. 38 (सर्वसाधारण) मध्ये भाजप, शेकाप, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरल्याने बहुरंगी राजकीय चित्र दिसत आहे. एकूणच सुधागड तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक ही केवळ स्थानिक सत्तासंघर्ष न राहता, महायुती आणि शेकापसेना आघाडी यांच्यातील राजकीय ताकदीची कसोटी ठरणार असून, ‌‘हायटेक‌’ प्रचाराच्या युगात मतदार नेमका कुणाच्या पारड्यात कौल देतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Raigad ZP election
Neral Kalamb Road Construction: निवडणूक काळात ठेकेदारांची मनमानी; नेरळ–कळंब राज्यमार्गावर निकृष्ट काँक्रीटीकरणाचा आरोप

सोशल मीडिया ठरतोय प्रभावी

प्रचाराचे नियोजनही आता डिजिटल झाले आहे. विविध पक्षांनी कार्यकर्त्यांसाठी तात्पुरते व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले असून, त्यावर सभा, बैठका, प्रचारदौरे आणि मतदार संपर्काचे नियोजन केले जात आहे. प्रत्यक्ष बैठकींच्या तुलनेत यामुळे वेळ आणि खर्चाची मोठी बचत होत असल्याचे चित्र आहे. फेसबुक आणि व्हॉट्सॲप वर निवडणुकांच्या चर्चा रंगल्या असून, कोणत्या उमेदवाराचे पारडे जड, कोण किती मते घेणार, कोणी किती विकासकामे केली यावर जोरदार विश्लेषण सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news