Ulwe Police Attack: अमली पदार्थ कारवाईला गेलेल्या मुंबई पोलिसांवर उलव्यात प्राणघातक हल्ला

चॉपर, तलवार, गावठी कट्ट्यासह प्रतिहल्ला; सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चार जण जखमी
Police Attack
Police Attackpudhari
Published on
Updated on

खारघर : संशयित अमली पदार्थ प्रकरणी कारवाईस गेलेल्या मुंबई पोलिसांवर उलव्यात हल्ला नवी मुंबईः अमली पदार्थ खरेदी विक्री प्रकरणी संशयित आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांवर आठ जणांनी जोरदार हल्ला चढवला होता. यात पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या समवेत असणारे पोलीस मित्र जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून हल्लेखोरांच्या विरोधात उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हल्ल्यात हल्लेखोरांनी चॉपर, तलवार, हॉकी स्पिक फायटर पंच चा वापर केला. तसेच त्यातील एका कडे गावठी कट्टा हि आढळून आला.

Police Attack
Pravin Darekar Mahad: महाड-पोलादपूरसाठी निर्भय भविष्य हवे असेल तर भाजप-राष्ट्रवादी युतीच पर्याय : आ. प्रवीण दरेकर

इस्माईल शेख, शाहिद खान, आयाज खान, आसिफ खान, मेराज खान, निजाम, शोएब, मेहराज आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी हा हल्ला करताना चॉपर, गावठी कट्टा, तलवार, फायटर पंच, हॉकी स्टिक याचा वापर केला आहे. हल्लेखोर अशा पद्धतीने प्रतीकार करीत प्रतिहल्ला चढवतील असे पोलीस पथकाला वाटलेच नाही.

Police Attack
Savarkar Sadan Heritage: सावरकर सदनला केंद्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा नाकारला; पुरातत्त्व विभागाची उच्च न्यायालयात भूमिका

मुंबई पोलीस विभागातील अमली पदार्थ विरोधी पथक शनिवारी रात्री उलवा परिसरात अमली पदार्थ खरेदी विक्री प्रकरणी संशयित आरोपीचा शोधार्थ धडकले होते. उलवा सेक्टर 19 येथील शगुन चौकात काही लोक आढळून आले त्यांच्या हालाचारी संशयास्पद होत्या. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी हे पथक गेले असता आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी हा हल्ला करताना चॉपर, गावठी कट्टा, तलवार, फायटर पंच, हॉकी स्टिक याचा वापर केला आहे. हल्लेखोर अशा पद्धतीने प्रतीकार करीत प्रतिहल्ला चढवतील असे पोलीस पथकाला वाटलेच नाही. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे, पोलीस मित्र फिरोज सिद्धीकी, अहमद रजा कुरेशी, आणि अतुल जैस्वाल हे जखमी झाले आहेत.

Police Attack
Dadar Murder Case: दादरमध्ये चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या तरुणाची हत्या; सहकाऱ्याला पोलिसांनी केली अटक

तस्करांचे आश्रयस्थाने

उलवे,नवी मुंबई,खारघर,तळोजा आदीभागात ड्रग्ज तस्कर छुप्या पद्धतीने वास्तव्य करुन आहेत.तेथून ते मोठ्या प्रमाणातअंमली पदार्थांची तस्करी करत असतात.यापूर्वीही पोलिसांनी अशा कारवाया केल्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news