

पेण : 40 एकरांवर समृद्ध शेत परिसरात केली उन्हाळी वालाची लागवडदत्ता म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्कपेण मान्सूनचा हंगाम आटोपताच नोव्हेंबर महिन्यात ओलसर जमिनीवर शेतात चौफेर पेरलेले वाल शून्य मशागत तंत्राने शेतकऱ्यांना वर्षभर पुरेल इतके आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत विनोबा भावे यांच्या जन्मगाव असलेल्या गागोदे गावातील शेतकऱ्यांनी वाल लागवड शेतीतून मिळविला आहे.
सध्या येथील 40एकर क्षेत्रात वाल पीक बहरले असून येत्या फेब्रुवारी अखेरीस वालाचे उत्पादन शेतक-यांच्या हाती येईल. बीन खर्चाची ही फायदेशीर शेती जमिनीचा ओलावा व पहाटे सकाळी पडणारे दतबिंदू हिवाळ्यातील थंड वातावरणात ही डौलदार शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर उत्पन्न मिळवून देत बळीराआला भरपूर समाधान मिळवून देत आहे.
ग्राममंडळ गागोदे बुद्धक पेण खोपोली महामार्गलगत वसलेल गाव, आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव त्यामुळे उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेल हे गाव येथील शेतकरी वर्षाकाठी दोन पीक घेतो. खरीपात भातपीक आणि स्थीत वालाची शेती शेतकरी आधुनिक रासायनिक खते न वापरता सेंद्रीय खताचा वापर करून जमिनीचे आरोग्याची निगा राखतपेराल ते उगवते, हा निसर्गाचा नियम याच तत्त्वावर आधारीत भात कापणी संपताच वाल पेरले जातात. शेताला सभोवार कुंपण घातले की बुटक्या जातीचे बियाणे एकरी बार ते पाच किलो पेरले की काम फत्ते झाले समजा.असा दावा शेतकरी वर्गातून केला जात आहे.
शून्य मशागत तंत्राचा अवाबंध आणि मिळणारे उत्पन्न ही जोमदार यामुळे गागोदे गावचे वालाला पेण खोपोली बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळे ही वाल लागवड शेतक-यांसाठी मोठबा प्रमाणात फायदेशीर ठरते.आर्थिक उत्पन्नातून फायदावाल पिकासाठी मध्यम, पोयट्याची आणि उत्तम निचरा होणारी व ओलावा धरून ठेवणारी जमीन निवडावी. हलक्या अमिनीत कमी वेळात ओमदार याद होते. फुले लवकर लागतात काळ्या जमिनीत वेलवर्गीय फांद्यांची वाढ जोमाने होऊन उत्पादन वाढते. सामान्यतः एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन मिळते.