

कर्जत ः कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत मध्ये रस्त्याचे डांबरिकरण करण्यासाठी एक किलोमीटर अंतराच्या कामाला तब्बल साठ लाख निधी आमदार महेंद्र थोरवे यांनी मंजूर करून दिला आहे. मात्र काम पूर्ण होण्याअगोदरचं रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. उघड्या खड्ड्यांमध्ये केवळ डांबरविरहित बांधकामाची खडी टाकून, ठेकेदार खड्डे बुजवीत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे त्यामुळे या कामाची पाहणी करून योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर करत आहे.
आमदार महेंद्र थोरवे यांनी विकास कामांसाठी करोडोंचा निधी आणला आहे. यामध्ये सर्वाधिक निधी तालुक्यातील रस्त्यांच्या बांधकामा साठी आणला आहे. मात्र अनेक ठिकाणी रस्त्याचे काम ठेकेदार निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप होत आहेत. त्या परिसरातील त्यांचेच कार्यकर्ते आमदारांकडे याबाबत तक्रार करत आहेत मात्र आमदार त्यावर योग्य ती कार्यवाही करत असल्याचे खंत स्थानिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
या रस्त्याचे काम पाहणारे अभियंता सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्याही कार्यपद्धतीवर शंका घेतली जात आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही, तोच संपूर्ण रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. या रस्त्याचे काम सुरू असतानाच पडलेले खड्डे बुजवताना ठेकेदाराने पुन्हा कामातील निकृष्ट दर्जाचा कळस गाठला आहे. खड्डे बुजवताना खड्ड्यांमधील माती व धुळ काढून, डांबर मारून त्यावर डांबर मिश्रित खडीचा थर टाकुन खड्डा भरावा लागतो, परंतू ठेकेदाराने थेट बांधकामाची डांबर विरहित खडी टाकून खड्डे बुजवले गेले असल्याचे ग्रामस्थांच्या म्हणणे आहे.
एक किलोमीटर रस्त्या करण्यासाठी साठ लाख खर्च येतो . रस्त्याचे काम व्यवस्थित सुरू आहे.
रोहित थोरात, अभियंता