Sunil Tatkare : रोहेकरांनी प्रत्येकाला त्यांची योग्य जागा दाखविली

खा.सुनील तटकरे यांचे प्रतिपादन, राष्ट्रवादीची विजयी रॅली, कार्यकर्त्यांसह नागरिकांचाही सहभाग
Roha municipal election victory rally
रोहेकरांनी प्रत्येकाला त्यांची योग्य जागा दाखविलीpudhari photo
Published on
Updated on

रोहे ः महादेव सरसंबे

कोणाला मी उत्तर देणार नाही, रोहा बदलतोय, येथील जनतेने कोणाला बदलय,कोणाला जागा त्यांची दाखवली हे कृतीतून दाखवून दिले आहे. मला यश दिलेल्या माझ्या तमाम रोहेकरांच मी शतशः ऋणी आहे. असे प्रतिपादन खा.सुनील तटकरे यांनी रोहे येथे केले. नगरपालिकेतील अभूतपूर्व यशानंतर आयोजित करण्यात आलेल्या विजयी रॅलीत ते बोलत होते.यावेळी त्यांनी नागरिकांचे मनापासूनआभार व्यक्त केले.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश संपादित केले.सोमवारी सायंकाळी रोहा अष्टमी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत निवडुण आलेले थेट नगराध्यक्ष वनश्री शेडगे व नवनिर्वाचित नगरसेवक यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दमखडी, मिराज हॉटेल, रोहा नगरपरिषद चौक, एसटी स्टँड, तीन बत्ती नाका, बाजारपेठ ते राम मारुती चौक अशी मिरवणूक काढण्यात आली.

Roha municipal election victory rally
Raigad dry fish : किनारी सुक्या म्हावऱ्याचा सुटलाय घमघमाट

या मिरवणुकीत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, माजी आ. अनिकेत तटकरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, समीर शेडगे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष वनश्री शेडगे, गट नेते महेंद्र गुजर, शहर अध्यक्ष अमित उकडे, माज सवाल, रुचिका जैन आदींसह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी राम मारुती नाका येथे उपस्थितांसमोर बोलताना खा. सुनील तटकरे यांनी राजकारणाच्या प्रवाहात अनेक वेळा फेरबदल होत असतात.कळत नकळत दीर्घकाळ सत्तेवर राहिल्यानंतर कुठेतरी प्रवाह सुप्तपणे निर्माण होत असतो. सातत्यही ठेवले, प्रखर राजकीय इच्छाशक्ती ठेवली. संवेदना,अंतःकरणातून भावना ठेवून समर्पित भावनेने लीन होत राहिलेलो आहे माझी किती वर्ष गेली, किती तपे गेली तरी यामध्ये अडथळे येऊ शकत नाही हे रोहेकरांनी आम्हाला या बाबतीत दाखवून दिले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वेगवेगळे प्रवाह निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला. त्या प्रवाहाला कुठल्याही प्रकारच्या टीकाटिप्पणी उत्तर दिले नाही.उलट मी सरळ बोलत आलो. संयमाने वागत आलो. याच गावात माझ्यावर टीकाटिप्पणी करण्यात आली. परंतु मतदारांनी फुलांचा वर्षाव आमच्यावर केला आहे. अभुतपुर्व व संस्मरणीय मतदान झाले.मी,आदिती,अनिकेत यांनी जमिनीवरच जमीनीवर पाय ठेवत लोकांची सेवा उत्तम पद्धतीने केली,असेही खा. सुनील तटकरे यांनी आवर्जून नमूद केले.

Roha municipal election victory rally
Mahad municipal election result: तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर महाडवर भगवा

नागरिकांचे पाठबळ व सुरक्षा कवच प्रेमाच्या अंतकरणातून मिळत, गावाचा विकासाचा राज्यात राज्याबाहेर नोंद आहे. तेवढ्यावर आम्ही समाधानी नाही. वनश्री व सर्व टीमला पुढील पाच वर्षांत काम करायचे आहे.पक्ष आणि पक्षाचे विचार शहरात रुजल्यामुळे अभुतपूर्व यश मिळाले.आजपासून नवीन नवीन योजना, कार्यक्रम, रोजगार,महि लांसाठी वेगवेगळे काम शहराच्या अतिशय उत्तम प्रकारे उभारणीसाठी आपण सर्वजण सज्ज होऊन काम करु या, असे सुचित केले.

जनतेच्या ऋणातच राहू

पक्षाला 2001 ते 2016 अशी सलग चार टर्म सलगपणे सेवा करण्याची संधी येथील जनतेन उन्नती आणि भरभरीसाठी दिली.आताही त्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे. रोह्याचे नाव ज्या पध्दतीने परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले, सी. डी. देशमुखांनी जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या पध्दतीने नेलं 21 व्या शतकात तितकाच डौलाने फडकवत त्याच पध्दतीने आपल्या सर्वांची मिळालेली साथ आयुष्यभरात आम्ही कधी विसरू शकत नाही.त्या ऋणात राहणे पसंद करु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news