Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटात १२०० फूट खोल दरीत कार कोसळली; अपघातात उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांचा मृत्यू

दोन दिवसांपासून होते बेपत्ता; शोधमोहिमेनंतर सह्याद्रीच्या दुर्गम दरीतून मृतदेह बाहेर काढला
Tamhini Ghat Accident
Tamhini Ghat AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

माणगाव: माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांच्या बाबतीत काळजाचा ठोका चुकवणारी दुर्दैवी घटना घडली आहे. पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात त्यांची कार तब्बल १२०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहिमेचा शेवट अखेर अत्यंत दुःखद ठरला. श्रीनिवास बेंडखळे हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते.

त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय आणि परिचितांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तपास सुरू केला. तपासादरम्यान त्यांच्या वाहनाचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाट परिसरात आढळून आले. त्यामुळे या परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.

ताम्हिणी घाटातील दुर्गम आणि खोल दरीत शोध घेत असताना श्रीनिवास बेंडखळे यांची कार सुमारे १२०० फूट खोल दरीत कोसळल्याचे निदर्शनास आले.

Tamhini Ghat Accident
Maharashtra Artist Pension: मुंबई, जालना, चंद्रपूरमधील हजारो कलाकार मानधनाच्या प्रतीक्षेत

हा परिसर अत्यंत दुर्गम असल्याने बचावकार्य मोठे आव्हानात्मक होते. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन बचाव पथकांनी तातडीने शोध व बचावकार्य सुरू केले.

सह्याद्रीच्या दुर्गम दरीतून मृतदेह बाहेर काढला. या कठीण बचावकार्यात सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था आणि शेलार मामा रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अथक प्रयत्नांनंतर दरीतून श्रीनिवास बेंडखळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Tamhini Ghat Accident
Maharashtra winter session: राज्यात विरोधी पक्षनेता नेमा; पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केली मागणी

त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी मृतदेह पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ही दुर्घटना नेमकी कशी घडली, वाहनावरील नियंत्रण सुटण्यामागील कारण काय होते, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. पुणे जिल्ह्यातील पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

गोरेगाव परिसरावर शोककळा

श्रीनिवास बेंडखळे यांच्या अपघाती निधनाची बातमी गोरेगावसह माणगाव तालुक्यात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मनमिळाऊ स्वभाव, दानशूर वृत्ती, उद्योजकीय क्षेत्रातील योगदान आणि सर्वांशी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची ओळख होती. ना. म. जोशी विद्यालयाच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदानही मोठे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.