

श्रीवर्धन शहर : श्रीवर्धन नगर परिषदेच्या 2 डिसेंबरला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांचा कौल कुणाला मिळणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता लागली आहे. एकूण 10 प्रभागातून एकूण 20 नगरसेवक निवडण्या साठी व एक नगराध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक होणार आहे.निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार निवडणुकीसाठी शहरात एकूण 20 मतदान केंद्रे राहणार आहेत. एकूणमतदार संख्या 12, 637 आहे.त्यामध्ये पुरुष मतदारांचीसंख्या 6, 202 असून स्री मतदारांची संख्या 6, 435 आहे.मतदानासाठी ई व्ही एम.मशीन्स वापरण्यातयेणार आहेत. मतमोजणीचे दिवशी म्हणजे 3 डिसेंबर 25रोजी मतमोजणीसाठी 10 टेबले मांडण्यात येणार असून 2 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल.निवडणुकीचेकामासाठी अंदाजे 250 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
तहसिलदार महेंद्र वाकलेकर हे निवडणूक निर्णय अधिकारी असून श्री.जीवन पाटील व श्री.मनोजमाने सहा.निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.पोलीस निरीक्षक श्री.उमेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पुरेसापोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या निवडणुकीत नगरसेवकाच्या 20 जागांसाठी एकूण 60 उमेदवार रिंगणात असून नगराध्यक्ष पदासाठी04 उमेदवार स्पर्धेत आहेत. या एकूण उमेदवारांत राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.गट),राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.गट),भा.ज.पा.,शिवसेना (शिंदे गट),शिवसेना(उ.बा.ठा.),नॅशनॅलिस्ट काँग्रेस व अपक्ष उमेदवारांचासमावेश आहे.