

भारत चोगले
श्रीवर्धन : अत्यंत चुरशीची, प्रतिष्ठेची आणि राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरलेली श्रीवर्धन नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत ठाकरे शिवसेनेची मशाल पेटली आहे.नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे जितेंद्रे सातनाक यांचा पराभव करत शिवसेनेच्या अतुल चौगुले यांनी चमत्कार करुन दाखविला आहे.खा. सुनील तटकरे,मंत्री आदिती तटकरे यांना होमपिचवर दे धक्का मिळाला आहे.शिंदेशिवसेनेलाही उमेदवारानी नाकारले आहे.
या निवडणुकीने श्रीवर्धनच्या राजकारणात नवे सत्तासमीकरण, बदलता जनादेश आणि ‘गड आला, पण किल्ला गेला’ अशी परिस्थिती स्पष्टपणे समोर आणली आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना ( ठाकरे गट) यांचे उमेदवार अतुल अरविंद चौगुले यांनी 3854 मते मिळवत 219 मतांच्या फरकाने विजय संपादन केला. त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी, माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रभाकर सातनाक यांना 3635 मते मिळाली.
विशेष म्हणजे 2016 साली झालेल्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत चौगुले यांचा अवघ्या 177 मतांनी पराभव झाला होता. नऊ वर्षांनंतर त्याच जनतेसमोर पुन्हा उभे राहत चौगुले यांनी तो पराभव विजयात रूपांतरित केला. इतर उमेदवारांमध्ये अक्षता प्रितम श्रीवर्धनकर (शिवसेना शिंदे गट) 671 मते, रविंद्र पोशा चौलकर (राष्ट्रवादी शरद पवार गट) 146 मते मिळाली आहे.
श्रीवर्धन नगरपरिषदेत 1996 व 2001 साली शिवसेनेची सत्ता होती, 2006 ते 2021 या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. 2025 च्या निवडणुकीत मात्र चित्र वेगळे असून, नगरपरिषदेत बहुमत राष्ट्रवादीकडे गेले, पण नगराध्यक्षपद शिवसेना ठाकरे गटाकडे आल्याने सत्ता आणि अधिकार यामध्ये स्पष्ट विभागणी झाली आहे. या निकालातून मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला संपूर्ण सत्ता न देता संतुलित, जबाबदारीची आणि विकासाभिमुख भूमिका बजावण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. नगरपरिषदेत समन्वय, राजकीय प्रगल्भता आणि प्रशासन यावरच शहराच्या विकासाचा वेग ठरणार आहे.
मी कुठेही जाणार नाही,ठाकरेंशी एकनिष्ठ
उद्धव ठाकरे शिवसेना सोडून मी कुठेही जाणार नाही. मी गेली 25 वर्ष उद्धव ठाकरे यांचा सर्वसामान्य शिवसैनिक आहे, अशी स्पष्टोक्ती श्रीवर्धन नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवडून आलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार ॲड.अतुल चोगले यांनी दैनिक पुढारी शी बोलताना केली आहे. माझे वडिल शिक्षक होते. त्यांनी माझ्यावर वडीलधाऱ्यांना वाकून नमस्कार करण्याचे संस्कार केले आहेत. त्यामुळे ज्यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले येथे आले त्यावेळी त्यांनी माझे अभिनंदन केले. आणि मी वडीलधारे या नात्याने वाकून नमस्कार केला. या ठिकाणी खासदार सुनील तटकरे जरी आले असते तरी मी त्यांना वाकून नमस्कार केला असता. याचा अर्थ मी अन्य कोणत्या पक्षात जाणार असा होत नाही. काहींनी तो चूकीचा अर्थ काढल्याचे ॲड.चोगले यांनी पुढे सांगितले.
पक्षीय बलाबल
पक्षीय बलाबल
एकूण 20 जागा
जाहीर जागा -20
राष्ट्रवादी काँग्रेस - 15 जागा
भाजप - 2 जागा
शिवसेना (शिंदे गट) - 3 जागा
प्रभाग 1 अ
करडे अंबिका सुरेश (शिवसेना) 83
राणे यशवंत लक्ष्मण (शिवसेना शिंदे गट) 220गुरव अनंत लक्ष्मण (राष्ट्रवादी काँग्रेस) 598 विजयी
प्रभाग 1 ब
भोसले वैदेही वैभव ( उबाठा) 77
वाघे वैशाली रामदास (शिवसेना शिंदे गट) 211, वैद्य शमा रजनीकांत ( राष्ट्रवादी) 604 विजयी
प्रभाग 2 अ
उघडा गणपत हरि (शिवसेना) 334
वाघे हरिदास पांडुरंग (राष्ष्ट्रवादी )
540 विजयी
प्रभाग 2 ब
दिवेकर शबनम समद (शप गट) 39
पाटील सुविधा (शिवसेना ) 286
मदन तेजस्विनी प्रथमेश ( उबाठा) 59
वाघे प्रगती ( राष्ट्रवादी ) 496 विजयी
प्रभाग 3 अ
माळी प्रतिक्षा जितेंद्र () 338
मोहित सलोनी स्वरूप (शिवसेना शिंदे गट) 356 विजयी
प्रभाग 3 ब
कोसबे अमेय अरूण ( राष्ट्रवादी ) 329
भोकरे सुजित (शिवसेना उबाठा), 28
भुसाणे देवेंद्र पांडुरंग (शिवसेना शिंदे गट) 358 विजयी
प्रभाग 4 अ
पाटील लतिका लव (शिवसेना) 170
येलवे दिपाली सचिन ( उबाठा) 97
चोगले सुप्रिया कैलास (भाजप) 540 विजयी
प्रभाग 4 ब
कदम अनुष्का जितेंद्र ( राष्ट्रवादी) 366
भोकरे सुजित रमाकांत ( उबाठा) 55
वेश्वीकर संतोष अरूण (शिवसेना शिंदे गट) 376 विजयी
प्रभाग 5 अ
श्रीवर्धकर विजया (शिवसेना) 308
प्राबेकर साक्षी स्वप्निल ( राष्ट्रवादी ) 552 विजयी
प्रभाग 6 अ
करडे गोदावरी (शिवसेना) 166
चौलकर रश्मी (शप गट) 6
चांदविडकर रूचिता (शिवसेना) 136, मुरकर राजसी (राष्ट्रवादी ) 525 विजयी
प्रभाग 6 ब
टोळकर मुझम्मिल मुख्तार (काँग्रेस) 158
राऊत विक्रांत चंद्रकांत (शिवसेना) 173
विचारे प्रसाद सुरेश () 500 विजयी
प्रभाग 7 अ
कदम विद्या विलास (शरद पवार गट) 33
पाटील पायल नंदकुमार (शिवसेना उबाठा) 275
चौले शिवानी हेमंत () 439 विजयी