

श्रीवर्धन : भारत चोगले
महाराष्ट्र भूषण कै. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात आज श्रीवर्धन नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी कायद्याच्या चौकटीत, नियमानुसार व लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ही विशेष सभा घेण्यात आली.
या निवडणूक सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष अतुल चोगले यांनी भूषविले. प्रभारी मुख्याधिकारी विठ्ठल राठोड व प्रशासकीय अधिकारी राऊल घुगे उपस्थित होते. नगरपरिषदेचे एकूण 20 सदस्य सभेला उपस्थित होते. त्यामध्ये अनंत लक्ष्मण गुरव, शमा रजनीकांत वैद्य, हरिदास पांडुरंग वाघे, प्रगती परेश वाघे, सलोनी स्वरूप मोहित, देवेंद्र पांडुरंग भुसाणे, सुप्रिया कैलास चोगले, संतोष अरुण वेश्विकर, साक्षी स्वप्नील पाब्रेकर, प्रणिल चंद्रकांत बोरकर, राजसी रितेश मुरकर, प्रसाद सुरेश विचारे, शिवानी हेमंत चौले, इफ्तिखार शेख अहमद राजपुरकर, शबिस्ता सैफुद्दीन सरखोत, समीर इस्माईल साठविलकर, बाळकृष्ण काशिनाथ गोरनाक, प्रविता मिलिंद माने, गुलाब महेंद्र मांडवकर व भावेश विश्वनाथ मांजरेकर यांचा समावेश होता.
उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनंत गुरव तर शिवसेना (शिंदे गट) कडून सलोनी मोहित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नियमाप्रमाणे अर्ज मागे घेण्यासाठी अध्यक्षांनी 15 मिनिटांचा अवधी दिला. कोणताही अर्ज मागे न घेतल्याने राजपत्राचे वाचन करण्यात आले व त्यानंतर हात वर करून आवाजी मतदान घेण्यात आले. या मतदानात अनंत गुरव यांना स्वतःचे मत धरून एकूण 17 मते मिळाली, तर सलोनी मोहित यांना 3 मते मिळाली. निकाल जाहीर करताना अध्यक्ष अतुल चोगले यांनी उपनगराध्यक्ष म्हणून अनंत गुरव यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. याच सभेत स्वीकृत सदस्य म्हणून रुची बोरकर व आराई रहमत अहमद शुकूर यांचीही स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
अनंत गुरव यांची निवड ही केवळ संख्याबळावर झालेली नसून ती त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीची अभ्यासक दखल मानली जात आहे. सलग दहा वर्षे नगरपरिषद सदस्य म्हणून कार्य करताना त्यांनी नियम, कायदे, ठराव प्रक्रिया आणि प्रशासकीय यंत्रणेचा सखोल अभ्यास करून प्रश्न मांडले. पाच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी मुद्देसूद भूमिका, संतुलित टीका आणि विकासाभिमुख सूचनांद्वारे सभागृहात प्रभावी कामकाज केले.
तटकरे कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनुभव, संयम आणि विकासाची स्पष्ट दिशा आत्मसात केली असून, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कार्यशैलीत दिसून येते. कामाची पोचपावती म्हणून मिळालेली ही निवड श्रीवर्धन नगरपरिषदेच्या कारभाराला अधिक अभ्यासपूर्ण, शिस्तबद्ध व लोकाभिमुख दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अनंत गुरव यांची निवड ही केवळ संख्याबळावर झालेली नसून ती त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीची अभ्यासक दखल मानली जात आहे. सलग दहा वर्षे नगरपरिषद सदस्य म्हणून कार्य करताना त्यांनी नियम, कायदे, ठराव प्रक्रिया आणि प्रशासकीय यंत्रणेचा सखोल अभ्यास करून प्रश्न मांडले. पाच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी मुद्देसूद भूमिका, संतुलित टीका आणि विकासाभिमुख सूचनांद्वारे सभागृहात प्रभावी कामकाज केले.