Accident News: मिसिंग लिंकजवळ एकाच दिवशी दोन अपघात

परिणामी एक्स्प्रेसवेवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

खोपोली: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंकजवळ शुक्रवारी संध्याकाळी तीन कंटेनर एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले होते. त्यानंतर रात्री त्याच ठिकाणी एका बसने समोरील उभ्या असलेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुसरा अपघात झाला.

या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले, तर एका कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी एक्स्प्रेसवेवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Accident
Fuel Price Hike: इंधनदरामुळे घरखर्च वाढणार; पाकीटबंद खाद्यपदार्थ, दैनंदिन वस्तूंच्या दरांत होणार वाढ

एक्स्प्रेसवेवर दोन ट्रक आणि एका कंटेनरचा भीषण अपघात झाल्यानंतर त्यांना मदत करण्यासाठी एक्स्प्रेसवेवरील वाहने थांबविण्यात आली असतानाच मिसिंग लिंकमधून भरधाव वेगात येणाऱ्या बस क्रमांक एमएच-48-सी 9300 ने समोरील व्हॅगनर कार, इनोव्हा, आय टेन कार आणि एर्टिगा अशा चार वाहनांना जोरदार धडक दिली. यात कारमधील एक जण गंभीर जखमी झाला, तर इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news