

पनवेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने सर्वच क्षेत्रांत अभूतपूर्व प्रगती साधली आहे. आज जागतिक स्तरावर भारताची ओळख ‘विश्वगुरू’ म्हणून निर्माण झाली असून भारतीयांना एक नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. असे गौरवोद्गार ठाणे विधानसभेचे भाजप आमदार संजय केळकर यांनी खांदा कॉलनी येथे काढले.
भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या संकल्पनेतून श्रीकृपा हॉलमध्ये शनिवारी सायंकाळी ‘विकसित भारत संकल्प संमेलन’ आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृहनेते प्रकाश बिनेदार, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, सरचिटणीस दीपक बेहेरे, प्रल्हाद केणी, नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोज भुजबळ, दशरथ म्हात्रे.
नगरसेविका सीताताई पाटील, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, मोनिका महानवर, प्रीती जॉर्ज, सरस्वती काथारा, विजयश्री पाटील, कुसुम पाटील, प्रियांका कांडपिले, शिवानी घरत, माजी नगरसेविका सारिका भगत, नीता माळी, पदवीधर प्रकोष्ठचे राज्य संघटक धनराज विसपुते यांच्यासह भाजप उत्तर रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.