Bandra Crime News: बाईक देण्यास नकार दिल्याने तरुणावर कोयत्याने हल्ला; मित्राविरूध्द गुन्हा दाखल

या हल्ल्यात शेहबाज मेहबूब शेख ऊर्फ राजा हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

मुंबई: बाईक देण्यास नकार दिला म्हणून एका २९ वर्षांच्या तरुणावर त्याच्याच मित्राने कोयत्याने हल्ला केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. या हल्ल्यात शेहबाज मेहबूब शेख ऊर्फ राजा हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन हल्ल्यानंतर पळून गेलेल्या तालिब जावेद शेख ऊर्फ मामा टकली याला अटक केली.

Crime News
BMC Schools: पालिकेच्या शाळांमध्ये मनाचे श्लोकची सक्ती

शेहबाज हा वांद्रे येथे राहत असून डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता तो बीएमसी मैदानाजवळ त्याची बाईक पार्क करून थांबला होता. यावेळी तिथे त्याचा मित्र तालिब आला आणि त्याने त्याच्याकडे त्याची बाईक मागितली.

त्याने त्याला बाईक देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने त्याने शेहबाजला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. त्यात त्याच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. नाकातून रक्त येत असल्याने तो भाभा रुग्णालयात जात होता.

यावेळी तालिब पुन्हा तिथे आला आणि त्याने बाईकवरुन त्याच्याशी वाद घालून त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. डोक्यावर कोयत्याने हल्ला करण्यापूर्वीच त्याने स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला.

Crime News
Mumbai traffic relief: मुंबईची वाहतूक कोंडीतून चार महिने सुटका

या प्रयत्नात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी शेहबाजला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. याच गोंधळात तालिब तेथून पळून गेला. जखमी झालेल्या शेहबाजला रहिवाशांनी तातडीने भाभा रुग्णालयात दाखल केले. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याला नंतर केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शेहबाजच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तालिब शेखविरुध्द हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर पळून गेलेल्या तालिबला पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news