Roha Panchayat Samiti Election 2026: रोहा पंचायत समितीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; सभापतीपदासाठी रंगली आतुरता

6 जागांवर विजय; महिला आरक्षणामुळे विजया पाशिलकर की समृद्धी कोळी यांच्यात निर्णायक लढत?
Elections Voting
Elections VotingPudhari
Published on
Updated on

रोहे : महादेव सरसंबे

रोहा पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे सहा सदस्य निवडून आले आहेत त्यामुळे रोहा पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आली असून पुढील सभापती पदाच्या व उपसभापती पदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सभापती व उपसभापती ची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत तर्कवितर्क चर्चेला जात आहेत.

Elections Voting
RTE Admission 2026 Maharashtra: आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल; नियम मोडणाऱ्या शाळांवर कडक कारवाईचा इशारा

मागील कारकिर्दीत रोहा पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात असली तरी रोहा पंचायत समितीच्या मागील निवडणुकीत (2017) पक्षीय स्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट वर्चस्व मिळवले होते. एकूण 8 सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 5 सदस्य विजयी झाले होते. यावर्षीच्या 2026 च्या निवडणुकीत यावेळी राष्ट्रवादी (अप गट) एक जागा वाढून 6 जागेवर राष्ट्रवादी (अप गट) पक्षाने विजय मिळवला आहे. उर्वरित एका जागेवर शिवसेना (उबाठा) व शिवसेना (शिंदे गट) जागा मिळाली आहे. एक हाती सत्ता राष्ट्रवादी (अप गट) पक्षाकडे आली आहे.

Elections Voting
Valentine Day Cake Trend 2026: प्रेमदिनासाठी केकची क्रेझ; बेंटो आणि गुप्त संदेश केकला तरुणाईची पहिली पसंती

यावर्षी निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्या मध्ये नागोठणे पंचायत समिती गण समृध्दी संतोष कोळी राष्ट्रवादी (अप गट), सुकेळी पंचायत समिती गण अरुणा जानु हंभीर शिवसेना (उबाठा), कोलाड गण जगन्नाथ गजानन धनावडे राष्ट्रवादी(अजित पवार गट), आंबेवाडी पंचायत समिती गण संजय संभाजी मांडलुस्कर राष्ट्रवादी (अजित पवार गट ), धाटाव पंचायत समिती गण विजया विनोद पाशिलकर राष्ट्रवादी (अजित पवार गट), भुवनेश्वर पंचायत समिती गण सुरेश धोंडु मगर राष्ट्रवादी (अजित पवार गट), न्हावे पंचायत समिती गण वर्षा हेमंत देशमुख शिवसेना (शिंदे गट) घोसाळे पंचायत समिती गण किसन गणपत मोरे राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश आहे.

Elections Voting
Raigad District Annual Plan 2026-27: पालकमंत्री नसतानाही रायगडच्या विकासाला गती; 576 कोटींचा प्रारूप आराखडा सादर

पंचायत समिती सभापतीच पदाचे आरक्षण महिला असल्याने विजया पाशिलकर, समृद्धी कोळी यामधील एका उमेदवाराच्या काळात सभापती पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. उपसभापती पदाची माळ सुरेश मगर, संजय मांडलुस्कर, जगन्नाथ धनावडे यापैकी एकाला मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news