रोहा नगरपरिषदेच्या अभियंत्यावर जीवघेणा हल्ला, कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास सोमवारपासून काम बंदचा कर्मचाऱ्यांचा इशारा
Roha Municipal Council engineer fatally attacked
रोहा नगरपरिषदेच्या अभियंत्यावर जीवघेणा हल्ला, नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामFamily Photo
Published on
Updated on

Roha Municipal Council engineer fatally attacked

रोहे : महादेव सरसंबे

रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या हद्दीतील दमखाडी येथे गटाराचे पाणी वर येत असल्यामुळे अत्यावश्यक काम म्हणून नगरपरिषदेचे अभियंता ओंकार भुरण व नगरपरिषदेचे कर्मचारी काम करत होते. यावेळी एका व्यक्‍तीने लाथा बुक्‍क्‍यांनी व त्याच्या सहकाऱ्यांनी रॉडनी नगरपरिषदचे अभियंता ओंकार भुरण यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे रोह्यात एकच खळबळ उडाली.

Roha Municipal Council engineer fatally attacked
किल्ले रायगड मार्गावरील संथ कामाविरोधात लाडवली ग्रामस्थ आक्रमक

या भ्याड हल्ल्याचा नगरपरिषद कर्मचारी संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला असून, संपूर्ण रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम सुरू केले आहे. आरोपींवर कठोर कारवाई न केल्यास सोमवार पासून काम बंद आंदोलन करणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. नगरपरिषदेचे अभियंता ओंकार भुरण यांनी रोहा अष्टमी नगरपरिषद कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.

यावेळी मुख्याधिकारी अजयकुमार एडके, अभियंता सुधीर भगत, स्वप्निल तोडणकर, विशाल काळे, युनियनचे रवींद्र आयनोडकर, सचीन दळवी, निलेश चाळके, जयेश भांबरकर, उदयनाथ ठाकरे, संजय शिंदे, अमेय गायकवाड आदी उपस्थित होते.

Roha Municipal Council engineer fatally attacked
Aditi Tatkare | १०० दिवस कृती आराखडा उपक्रमात 'महिला व बालविकास विभाग' राज्यात सर्वप्रथम

या पत्रकार परिषदेत माहिती देताना अभियंता ओंकार भुरण यांनी रोहा शहरातील रोहा कोलाड मार्गावरील दमखाडी साई मंदिर समोरील भुयारी गटार चेंबरमधुन पाणी बाहेर येत होते. या संबंधित नागरिकांकडून व माजी नगरसेवक यांच्याकडून वारंवार तक्रारी नगर परिषदेकडे येत होत्या. या अनुषंगाने हे अत्यावश्यक काम असल्याने रोहा नगरपरिषदेचे अभियंता ओंकार प्रकाश भुरण व त्यांचे नगर परिषदेचे कर्मचारी, ठेकेदारांचे कर्मचारी ३० मे रोजी रात्र साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी त्यांनी भुयारी गटाराचे झाकण उघडे करुन काम करत होते.

हे काम सुरू असताना १ मे च्या पहाटे १ वाजण्याच्या सुमारास एक व्हॅगनार कार तिथे आली. त्या कारमधून कन्हैया यदुराम पडवळ राहणार दमखाडी व त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम आला. त्यावेळी सदरची व्हॅगनार कार ही नगर परिषद कर्मचारी काम करीत असलेल्या भुयारी गटार चेंबर येथे त्यांनी उभी केली. येथे भुयारी गटारीचे शासकीय काम सुरु आहे. त्यामुळे तुमची गाडी येथून लांब लावा, जर गाडीचा टायर आत गेला तर आमचे कामही थांबेल व तुमची गाडीही अडकून राहील असे अभियंता भुरण यांनी पडवळ यांना समजावुन सांगितले. त्यावेळी कैन्हया यांनी तु मला सांगणार कोण आहे. मी येथीलच आहे. मी माझं बघुन घेईन असे बोलला.

तेव्हा श्री भुरण यांनी मी नगरपरिषद अभियंता म्हणून येथे काम पाहत आहे असे सांगितले. त्यानंतर कैन्हया पडवळ यांनी नगरपरिषद अभियंता भुरण यांच्याजवळ जाऊन त्यांची मान हातात पकडुन मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत भुरण यांचा शर्ट ही फाटला गेला. यावेळी प्रसंगावधान राखून भुरण हे स्वत : ला कैन्हया पडवळ यांच्याकडुन सोडवणूक करुन बाजुला होत लांब झाले. यावेळी कैन्हया पडवळ यांच्या समवेत असलेला अनोळखी व्यक्तीने व्हॅगनार कार मधुन स्टीलचा रॉड बाहेर काढुन मानेच्या मागील भागात मारला. यानंतर कैन्हया पडवळ याने त्यांच्या समवेत असलेल्या इसमास कार घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा पडवळ याने परत भुरण यांची मान पकडुन तु मला कोण सांगणारा मी इथलाच आहे. तुला बघुन घेईन असे बोलून भुरण यांना जीवे मारण्याची धमकी दिल्‍याची माहिती रोहा नगरपरिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ओंकार भुरण यांनी दिली.

या घटनेनंतर नगरपरिषद अभियंता यांनी रोहा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रोहा पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे रोह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नगरपरीषद कर्मचारी यांनी काळया फिती लावुन काम करीत आहेत. आरोपीवर कठोर कारवाई न झाल्यास सोमवार पासुन काम बंद आंदोलन करणार असल्याचे नगरपरिषद कामगार संघटने रविंद्र आयनोडकर, सचीन दळवी याच्यावतीने सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news