Aditi Tatkare | १०० दिवस कृती आराखडा उपक्रमात 'महिला व बालविकास विभाग' राज्यात सर्वप्रथम

आगामी काळातही आपण अशीच कामगिरी करणार : मंत्री आदिती तटकरे
Aditi Tatkare
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (File Photo)
Published on
Updated on
जयंत धुळप

Ministry of Woman and Child Development

रायगड: आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः महिला व बालविकास विभागासाठी अत्यंत गौरवाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या "१०० दिवस कृती आराखडा" उपक्रमात महिला व बालविकास विभागाने कल्याणकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी, विभागाचे आधुनिकीकरण व लोकाभिमुख प्रशासन हे ध्येय साध्य करत ८० टक्के गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आगामी काळातही आपण अशीच कामगिरी करत राहू, असे वचन आजच्या महाराष्ट्र दिनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना दिले.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार

महिला व बालविकास विभागाच्या या यशस्वी वाटचालीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल तटकरे यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

Aditi Tatkare
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीतून अदिती तटकरे, भरत शेठ गोगावले यांचा एकत्रित प्रवास

माझी लाडकी बहिण योजनेत ३ महिन्यांत २.४७ कोटी महिलांना थेट लाभ

राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाची यशस्वीतता साध्य करताना विविध टप्प्यांवर हे यश साध्य करण्यात आले आहे. या मध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'त अवघ्या ३ महिन्यांत २.४७ कोटी महिलांना थेट डायरेक्ट बँक ट्रान्स्फरद्वारे आर्थिक लाभ देण्यात आला आहे. ५० लाख महिलांचे आधार-सीडिंग करून योग्य लाभवितरण सुनिश्चित करण्यात आले.

९५ टक्के तक्रारी वेळेत निकाली काढण्यात यश

पोषण अभियानात २.४५ कोटी लोकसहभागी उपक्रम, ५१ हजार बालकांवर उपचार, ३७ हजार सेविकांचे प्रशिक्षण, ३५९५ शहरी बालविकास केंद्रे, डिजिटल यश आणि पारदर्शक प्रशासन ई-ऑफीस प्रणालीचा ८५ टक्के वापर, आरटीआय आणि आरटीएस अद्ययावतीकरण, ९५ टक्के तक्रारी वेळेत निकाली काढण्यात यश मिळवले आहे.

विविध योजनांचे उद्दिष्ट १०० टक्के पार

महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता अंतर्गत २० लाख महिलांना मावीम व नवतेजस्विनी योजनेतून उद्योजकतेकडे वाटचाल करण्यात यश, अॅमेझॉन, ओएनडीसी, गीझ, यासारख्या संस्थांसोबत भागीदारी, राज्य शासन व केंद्र शासन यामध्ये समन्वयाची प्रभावी अंमलबजावणी, विविध योजनांचे उद्दिष्ट १०० टक्के पार, अन्न व पोषण, गृहभेटी, ग्रोथ मॉनिटरिंग यामध्ये संपूर्ण साध्यता साध्य करण्यात यश आले आहे.

संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन

राज्यात विभागाने मिळवलेला हा प्रथम क्रमांक केवळ आकड्यांचा विजय नाही, तर ही महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविकेची, प्रत्येक लाभार्थिनीची, आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची कर्तव्यनिष्ठा आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हा प्रशासन, आणि विशेषतः मुख्यमंत्री महोदय आणि महिला व बालविकास खात्याच्या संपूर्ण टीमचे मी हार्दिक अभिनंदन करते, असे मंत्री तटकरे यांनी अखेरीस म्हटले आहे.

Aditi Tatkare
रायगड : मुंबई-पुण्याला जोडणारा मिसिंग लिंक प्रकल्प 96 टक्के पूर्ण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news