Revdanda Agarkot Fort: रेवदंड्यातील आगरकोटचा ‘सातखणी बुरूज’ पर्यटकांचे आकर्षण; पोर्तुगीज काळातील अभेद इतिहासाची साक्ष

समुद्रमार्गे शत्रूवर नजर ठेवण्यासाठी उभारलेली 1534 मधील रचना; फ्रान्सिस्कन चर्चचे अवशेष आजही उभे
Revdanda Agarkot Fort
Revdanda Agarkot FortPudhari
Published on
Updated on

रेवदंडा : आगरकोट किल्ला इतिहासीक काळात पोतुर्गिजाचा अभेद बालेकिल्ला, आगरकोट सभोवातलची समुद्र तटबंदी आणिडोमिनिकन चर्च, फ्रांसिस्कन चर्च, चौकोनी बुरूज आणि सातखणी पहाणे पर्यटक व पै-पाहूणे यांची नेहमी गर्दी असते.आगरकोट किल्लाच्या वावव्येकडील बुरूजाजवळील लहान दरवाजाचा आग्येेस 45.72 मीटरवर तटबंदीच्या

Revdanda Agarkot Fort
Raigad Police Bharti 2026: रायगड पोलीस भरतीला सुरुवात; 97 जागांसाठी 5,373 अर्ज, अलिबाग मैदानात कडेकोट बंदोबस्त

पश्चिमेकडील भिंतींतपडलेल्या भगदाडासमोर 1534 च्या सुमारास बांधलेल्या फ्रांन्सिस्कन इमातीच्या मध्यभागी असलेल्या 6.09 मीटर चौकोनी आकाराच्या सातखणीबुरूजाच्या भिंतीच्या सांगाडा पहावयास मिळतो. पुर्वी त्याची उंची 29.26 मीटर इतकी नमुद केलेली असली तरी वरच्या बाजूने भिंती पडल्यामुळेउंची कमी झालेली आहे. बुरूजाच्या लगत भोवताली सर्व इमारती भिंती पुर्णपणे पडलेल्या असून आजूबाजूस अर्धवट भिंतीचे अवशेष दिसतात.

Revdanda Agarkot Fort
CIDCO Land Case: सरकारी कागदपत्रे गायब; विकसित भूखंडासाठी शेतकऱ्याला 38 वर्षांची प्रतीक्षा, हायकोर्टाने फटकारल्यावर न्याय

समुद्र मार्गे शत्रुनी हल्ला केल्यास शत्रुवर करडी नजर ठेवण्यासाठी हा सातखणी बुरूजाची बांधणी झाली असावी असे म्हटले जाते.या सातखणी बुरूजाच्या वरील बाजूकडून दुरवर समुद्र किनारी नजर जात असल्याने शत्रुच्या हालचालीवर नजर ठेवण्यास या सातखणी बुरूजाचाउपयोग केला जात असे.

Revdanda Agarkot Fort
Mahad Elections: महाडमध्ये वारशापलीकडचे नेतृत्व; विकासशेठांची ठाम छाप

सध्या रेवदंडा मोठे बंदर कडे जाणाऱ्या मुख्यः रस्त्यावरून सातखणी बुरूजाकडे जाण्यासाठी मार्ग आहे. या ठिकाणी पर्यटक व पै-पाहूणे यांची नित्याची रेलचेल असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news