

रेवदंडा ः महेंद्र खैरे
रेवदंडा येथे आयोजीत कुस्ती स्पर्धेत वाडगाव आखाडयाने प्रथम क्रमांक पटकाविला, तर बेलोशी आखाडानी व्दितीय तर पनवेल आखाडा तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरला.
रेवदंडा येथे श्री छत्रपती शिवाजी मंडळाचे वतीने सालाबाद प्रमाणे मंगळवार 21 ऑक्टोबर रोजी सायकांळी साडेतिनच्या सुमारास लक्ष्मीपुजनच्च्या निमित्ताने को.ए.सो.हायस्कुलचे प्रांगणात सलग 72 व्या वर्षी कुस्ताचे जंगी सामन्यास सुरूवात झाली.कुस्ती स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह महाराष्ट्र कुस्तीगिर संघटनेचे कार्याध्यक्ष जयेंद्र भगत, प्रमोद भगत, रेवदंडा ग्रा.प. माजी सदस्य संदिप खोत हे मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी श्री मारूतीरायांची प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करण्यात आली, व महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष जयेंद भगत यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले, तसेच कुस्ती मैदानाचा शुभारंभ शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे व श्री छत्रपती शिवाजी महाराज रेवदंडा-चौल अध्यक्ष सुरेश खोत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेसाठी रेवदंडा ग्रा.प. सदस्य पै. इनुसभाई तांडेल यांचे स्मरणार्थ प्रथम,व्दितीय, तृतीय क्रमांकास चषक ठेवण्यात आले होते तसेच प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांकास रोख पारितोषीक वितरीत करण्यात आली.
या स्पर्धेत पंचाचे काम सुधाकर पाटील, वैभव मुकादम, संदिप मोरे, चंद्रकांत धाटावकर, तसेच टाईम किपरचे काम बाळाशेठ गुरव यांनी पाहिले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी मंडळ अध्यक्ष सुरेश खोत, उपाध्यक्ष शरद वरसोलकर, खजिनदार हेमंत गणपत, ग्रा.प.सदस्य खलिल तांडेल, मधुकर फुंडे, माजी ग्रा.प.सदस्य संदिप खोत, निलेश खोत, महेश ठाकूर, बाळु नवखारकर, विजय आढाव, राहूल हेमंत गणपत, आदीने स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.