Local body election 2025 : जिल्हा परिषद-पंचायत समिती आरक्षणावर शिक्कामोर्तब

आता लक्ष निवडणुकांच्या घोषणांकडे; आठवडाभरात तारखा जाहीर होण्याची शक्यता
Local body election 2025
जिल्हा परिषद-पंचायत समिती आरक्षणावर शिक्कामोर्तबpudhari photo
Published on
Updated on

रायगड : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 चे अनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

शासन आदेशान्वये जिल्हा परिषद निवडणूक विभागाची व पंचायत समितीच्या निर्वाचक गणांची अंतिम आरक्षणाची अधिसूचना 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

Local body election 2025
Mahavitaran rooftop solar project : रायगडातील गरीबांची घरे होणार प्रकाशमान

या आरक्षण कार्यक्रमानुसार 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या व पंचायत समितीच्या निर्वाचक गणांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. प्रारुप आरक्षणाची अधिसूचना 14 ऑक्टोबर 2025 रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे. 14 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत प्रारुप आरक्षण अधिसूचनेवरील हरकती व सूचना स्वीकारण्यात आल्या आहेत. ही अंतिम आरक्षण यादी संबधित कार्यालयाच्या सूचना फलकावर, जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालये व पंचायत समित्यांच्या कार्यालयीन सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण 59 गटांच्या सदस्यपदाचे आरक्षण 13 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात पनवेल तालुक्यातील पालीदेवद महिला राखीव, माणगाव तालुक्यातील गोरेगाव; अनुसूचित जमाती प्रवर्गात कर्जत तालुक्यातील कशेळे, कळंब व मोठे वेणगाव, पेण तालुक्यातील महालमि-याचा डोंगर व जिते, खालापूर तालुक्यातील चैक, सुधागड तालुक्यातील राबगाव, श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन, पनवेल तालुक्यातील नेरे यामध्ये जिते, मोठे वेणगाव, कशेळे, बोर्लीपंचतन व चौक येथे महिला आरक्षण जाहीर झाले आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गात तळा तालुक्यातील रहाटाड, पनवेल तालुक्यातील केळवणे, वावेघर व वावंजे, महाड तालुक्यातील दासगाव, खरवली व बिरवाडी, अलिबाग तालुक्यातील चेंढरे व काविर, उरण तालुक्यातील जासई, चिरनेर, कर्जत तालुक्यातील कडाव, पोलादपूर तालुक्यातील कापडे बु., रोहा तालुक्यातील आंबेवाडी व घोसाळे यामध्ये महिलांसाठी आंबेवाडी, घोसाळे, वावंजे, वावेघर, बिरवाडी, खरवली, रहाटाड व चेंढरे या गटांमध्ये महिला आरक्षण जाहीर झालेले होते.

Local body election 2025
Balganga irrigation project : पुनर्वसन करा,अन्यथा सातबारा कोरे करा

सर्वसाधारण महिला प्रवर्गात एकूण 16 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये गव्हाण, माणगावतर्फे वरेडी, आत्करगाव, चाणजे, तळाशेत, शिहू, जांभूळपाडा, नवघर, चरई खुर्द, नेरळ, कोर्लई, पळस्पे, आंबेपूर, थळ, वडघर व आराठी या गटांचा समावेश आहे. तर खुल्या प्रवर्गात वासांबे, सावरोली, दादर, वडखळ, शहापूर, चैल, राजपुरी, नागोठणे, भुवनेश्वर, निजामपूर, मोर्बा, पाभरे, पांगळोली, करंजाडी, नडगावतर्फे बिरवाडी व लोहारे या गटांचा समावेश झालेला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट आणि गण रचना, आरक्षण जाहीर केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, प्रथम जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जातील असे सांगितले जात आहे.

प्रशासनाची जोरदार तयारी

गेली दोन-तीन वर्षे रखडेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. आतापर्यंत प्रभाग रचना, सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षण निश्चित झाले आहे. लवकरच मतदार यादी अंतिम होतील. त्यामुळे प्रशासनाची निवडणुकीची तयारी पूर्ण होत आली आहे.

  • जिल्हा परिषदेच्या एकूण 59 गटांच्या आरक्षणामध्ये एकूण 30 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 2 जागा, अनुसूचित जमातीसाठी 9 जागा व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 15 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरीत गट हे खुल्या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले.

  • सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट आणि गण रचना, आरक्षण जाहीर केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, प्रथम जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. आता आठवड्याभरात निवडणूक आचारसंहिता लागण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news