Ajit Pawar Plane Crash Black Box: विमानाची टेल सुस्थितीत, मग ब्लॅक बॉक्स कसा जळला?

आ. अमोल मिटकरींचा सवाल : एरियल फोटोच केला पोस्ट
Ajit Pawar Plane Crash Black Box
Ajit Pawar Plane Crash Black BoxPudhari
Published on
Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यूनंतर हा अपघात होता की घातपात याची चौकशी सुरू आहे. या विमानातील ब्लॅक बॉक्स विमानाला लागलेल्या आगीमुळे जळला असल्याची माहिती मंगळवारी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी अपघातग्रस्त विमानाची टेल (शेपटाकडील भाग) सुस्थितीत असताना त्या ठिकाणी असलेला ब्लॅक बॉक्स कसा जळाला, असा प्रश्न उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत. आपल्या सोशल मीडिया हँडलवर मिटकरी यांनी अपघातग्रस्त विमानाचा एरियल फोटो (आकाशातून घेतलेले छायाचित्र) थेट शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत.

Ajit Pawar Plane Crash Black Box
Shatrughan Sinha Khamosh Dialogue: सोशल मीडियाला ‌‘खामोश‌’ करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा हायकोर्टात

आमदार मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्यानंतर सर्वप्रथम विमान कंपनीवर गंभीर आरोप केले होते. आता ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती समोर आल्यानंतर मिटकरींचा संशय आणखी बळावलाय. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही.

Ajit Pawar Plane Crash Black Box
Ajit Pawar Plane Crash Black Box: ‘ब्लॅक बॉक्स सुरक्षित, पण राजकारण्यांपासून असुरक्षित?’ – रोहित पवारांचा घातपाताचा संशय कायम

त्यामुळेच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो. अपघात झाला त्या विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे. ती अजिबात जळालेली नाही. त्यामुळे या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. तसेच ब्लॅक बॉक्स असा बनवला गेलेला असतो की हाय टेम्परेचरमध्येसुद्धा कितीही आग लागली तरीही तो जळून खाक होत नसतो, असेही ते पुढे म्हणाले. त्यामुळे अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला, असा प्रश्न मिटकरींनी उपस्थित केलाय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news