Mumbai Airport Expansion: मुंबई विमानतळ विस्तारासाठी भोवतालच्या झोपड्यांचे पुनर्वसन; 100 एकर भूखंड मोकळा होणार

पात्र झोपडीधारकांना जवळच घरे; टी-1 पूर्ण बंद करून क्षमतावाढीचे नियोजन
Mumbai Airport Expansion
Mumbai Airport ExpansionPudhari
Published on
Updated on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भोवताली असणाऱ्या झोपड्या तोडण्याचे नियोजन असून यामुळे साधारण 50 ते 100 एकरचा भूखंड विमानतळाच्या विस्तारासाठी मोकळा होईल. मात्र तत्पूर्वी झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

Mumbai Airport Expansion
Manikarnika Ghat demolition: मणिकर्णिका घाट तोडकामावरून काँग्रेसचा हल्लाबोल; मोदी सरकारने माफी मागावी : सपकाळ

पुनर्वसन प्रक्रियेत पात्र झोपडीधारकांना विमानतळाच्या जागेवर किंवा जवळपासच्या परिसरात घर दिले जाणार आहे. अपात्र झोपडीधारकांनाही अन्य काही पर्याय दिले जातील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यामुळे मुंबई विमानतळावरील वाहतूक काही प्रमाणात नवी मुंबईला वळवण्यात येणार आहे.

Mumbai Airport Expansion
Mohan Bhagwat statement: धर्माच्या मार्गावरून चाललो तरच भारत विश्वगुरू राहील : मोहन भागवत

जुन्या मुंबई विमानतळाचे टी 1 - ए, टी - 2 बी आणि टी 1 सी असे तीन भाग आहेत. यापैकी टी 1 ए या इमारतीचा वापर 2005 पर्यंत भारतीय विमानकंपन्यांकडून केला जात होता. गेल्या काही वर्षांपासून ही इमारत प्रवाशांसाठी बंद करण्यात आली. 2017 पासून टी 1 बी हीच इमारत टी 1 म्हणून ओळखली जाते. टी 1 ए इमारतीसोबतच येथील उन्नत मार्ग, तात्पुरते छत, इत्यादी बांधकामेही पाडली जाणार आहेत.

Mumbai Airport Expansion
BJP BMC Mayor Strategy: महापालिकांतील सत्तास्थापनेवर भाजप निर्धास्त; अंतिम निर्णय फडणवीसांवरच

नवी मुंबई विमानतळाचे टी-2 सुरू झाल्यानंतर मुंबई विमानतळाचे टी-1 पूर्ण बंद केले जाईल व त्यानंतर नव्याने बांधकाम करून विमानतळाची क्षमता वाढवली जाईल. सध्या मुंबई विमानतळावरून दरवर्षी 15 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. क्षमतावाढीनंतर 20 दशलक्ष प्रवासी दरवर्षी प्रवास करू शकतील. विस्तारीकरणासाठी भोवतालच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करून भूखंड मोकळा केला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news