Raigad News | रायगडमधील ६ हजार जलस्रोतांचे सर्वेक्षण

Raigad Water Source Survey | ८०१ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड; ११ पिवळे, जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीला रेड कार्ड नाही
Water Management Raigad
Raigad Water Source Survey (Pudhari Photo)
Published on
Updated on
सुवर्णा दिवेकर

Water Management Raigad

अलिबाग : पावसाळा सुरु झाला कि ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात दूषित होतात परिणामी गावात साथ रोगांचा प्रादुर्भाव होतो. पर साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण वर्षातून दोन वेळा करण्यात येते. या सर्वेक्षणामध्ये मागील तीन वर्षात जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीला रेड कार्ड देण्यात आलेले नाही. जिल्ह्यातील ८१२ ग्रामपंचायतींमधील ६ हजार ८९ जलस्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये ८०१ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले असून, ११ ग्रामपंचायतीला पिवळे तर एकाही ग्रामपंचायतीला रेड कार्ड दिलेले नाही.

पिण्याच्या पाण्यामुळे कावीळ, कॉलरा, अतिसार, टायफाइड, अमेबियासिस, गॅस्ट्रो, खरुज व अन्य आजार पसरतात. त्यासाठी ग्रामपंचायतींकडून जलस्रोतांचे सर्वेक्षण करून ते दूषित होऊ नयेत म्हणून पाणी शुद्धीकरण केले जाते. त्यासाठी जलस्रोतांचे सर्वेक्षण हे एप्रिलमध्ये मान्सूनपूर्व आणि मान्सून पश्चात ऑक्टोबर महिन्यामध्ये करण्यात येते. पावसाळ्यात जलजन्य आजार रोखण्यासाठी प्रत्येक गावात जल- शुद्धीकरण केले जाते. कावीळ, कॉलरा, अतिसार, टायफाइड व इतर आजार हे दूषित पाण्यातून होतात.

Water Management Raigad
रायगड : आंबा नदीच्या पलीकडे अडकलेल्या ६ तरुणांना वाचविण्यात यश

रायगड जिल्ह्यात शासनामार्फत पाणी पुरवठ्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळत आहे. त्याचा परिणाम नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या योजना लवकरात लवघकर पूर्ण होणे आवश्यक आहे.

Water Management Raigad
Raigad News | माथेरान पोस्टासाठी आता कर्जत ते माथेरान ड्रोनद्वारे टपालसेवा

रेड कार्ड

ग्रामपंचायतीमधील ५० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखमीच्या स्रोतांवर अवलंबून ग्रामपंचायतीला रेड कार्ड देण्यात येते.

Water Management Raigad
महाड : ब्रेक निकामी झाल्याने एसटी बस शेताच्या बांधावर आपटली

पिवळे कार्ड

देताना गावातील प्रत्येक स्रोताची जोखीम नमूद करतात. ग्रामपंचायतीमधील ५० टक्के, ५० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखीम अथवा कमी जोखमीच्या स्रोतांवर अवलंबून नसल्यास त्या ग्रामपंचायतीस पिवळे कार्ड दिले जाते.

हिरवे कार्ड

ग्रामपंचायतीमधील ५० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या कमी जोखमीच्या स्रोतांवर अवलंबून असेल्या ग्रामपंचायतीस हिरवे कार्ड देण्यात येते

पाणी गुणवत्ता सर्वेक्षण आपण वेळच्यावेळी करत आहोत. ग्रामपंचायतींना लागणाऱ्या औषधांचा साठा उपलब्ध करण्यात येतो. त्यामुळे आपल्याकडे एकाही ग्रामपंचातीला रेड कार्ड नाही.

संजय वेंगुलेकर, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद रायगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news