रायगड: एसटी बस-कारचा अपघात; बस चालक, मुलगी जखमी

रायगड: एसटी बस-कारचा अपघात; बस चालक, मुलगी जखमी
Published on
Updated on

रायगड: पुढारी वृत्‍तसेवा : एसटी बसला कारने दिलेल्या धडकेत बस चालकाच्या पायाला व हाताला दुखापत झाली. तर एक शाळकरी मुलगी किरकोळ जखमी झाली. या अपघातानंतर बस रस्त्याच्या बाजूला नाल्यात घसरली. ही घटना आज (दि.२२) सकाळी साडेअकराच्या सुमारास म्हसळा शहराजवळील साईचेक पोस्टजवळ घडली.

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी श्रीवर्धन ते स्वारगेट ही बस (एमएच 14 बीएफ 2322) म्हसळा शहरातून निघाली होती. यावेळी साईचेक पोस्टजवळ बसला कारने (TS07BF2322) जोराची ठोकर दिली. यावेळी एसटी बस रस्त्याच्या बाजूला नाल्यामध्ये घसरली. यात एक शाळेत जाणारी मुलगी आर्या पाडावे (रा.शिरगाव) किरकोळ जखमी झाली. तर बस चालकाच्या पायाला व हाताला दुखापत झाली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news