Raigad fort light show: किल्ले रायगडावर देशातील पहिला 360° लाईट अँड साऊंड शो! इतिहास नव्या तंत्रज्ञानात उजळणार

45 मिनिटांत शिवराज्याभिषेकापासून मावळ्यांच्या पराक्रमापर्यंतचा प्रवास; छत्रपती संभाजीराजेंनी केली तयारीची पाहणी
Raigad fort light show
Raigad fort light showPudhari
Published on
Updated on

नाते : इलियास ढोकले

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने नव्या रूपात उजळणारआहे.रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून देशातला पहिलाच 360 डिग्री म्हणजेच 360 चा भव्य लाईट अँड साऊंड शो लवकरच किल्ले रायगडवर सुरु होणार आह.या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष,माजी खा. छत्रपती संभाजी राजे यांनी नुकतीच किल्ले रायगडला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील तयारीची पाहणी केली.

Raigad fort light show
Karjat BJP Alliance Stand: कर्जतमध्ये भाजपाचा ‘एकला चलो रे’चा नारा! शिंदे गटाशी युतीला कार्यकर्त्यांचा ठाम विरोध

या शो मधून रायगडचा गौरवशाली इतिहास तब्बल 45 मिनिटात प्रकाश आणि ध्वनीच्या माध्यमातून जिवंत केला जाणार आहे. बाजारपेठ, नगारखाने सदर,

जगदीश्वराचं मंदिर, शिवसमाधीस्थळ, मावळ्यांचे पराक्रम आणि शिवराज्याभिषेक सोहळा हे सर्व क्षण प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत.

Raigad fort light show
Roha Zilla Parishad Election: रोहा जिल्हा परिषद निवडणूक तापली! ‘आयात उमेदवारां’च्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ

सोशल मीडियावर टीका न करता थेट प्राधिकरणाकडे तक्रार करावी रायगड हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे आणि त्यांचा जतन करण्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

छत्रपती संभाजीराजे. अध्यक्ष,रायगड प्राधिकरण

Raigad fort light show
Muslim Premier League: मुस्लीम प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू

पुरातत्व विभागाची भूमिका महत्वाची

रायगड प्राधिकरणाने घोषित केलेल्या या बहुचर्चित व प्रतीक्षेत व शिवभक्तांचे आकर्षणाचे केंद्र ठरणाऱ्या लाईट अँड साऊंड शो संदर्भात केंद्रीय पुरातत्व विभागाची भूमिका काय असेल याबाबत शिवभक्तांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाने सूर्यास्तानंतर किल्ले रायगडावर राहण्यासाठी मनाई हुकूम यापूर्वीच असल्याचे घोषित केलेला आहे. संबंधित लाईट अँड साऊंड शो पाहण्यासाठी रात्री किल्ले रायगडावर शिवभक्तांना उपस्थित रहावे लागणार असल्याने त्यांची राहण्याची व्यवस्था मान्य विषयाबाबत पुरातत विभागाची याबाबतची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news