Crop Insurance 2026: पीक विमा योजनेत सहभागासाठी 31 जुलैपर्यंत मुदत

लागवड केलेल्या पिकाची नोंदणी डिजिटल क्रॉप सर्वे ॲपवर करणे बंधनकारक
Crop Insurance 2026
Crop Insurance 2026Pudhari
Published on
Updated on

अलिबाग: राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२६ व रब्बी हंगाम २०२६-२७ या एक वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

त्यानुसार रायगड जिल्ह्यासाठी इपको टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांची एक वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी दिली आहे.

Crop Insurance 2026
Raigad LPG Cylinder: हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे ३ हजार सिलेंडर गेले वाहून

अधिसूचितं पिकांसाठी खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत पात्र आहेत. यावर्षी ही योजना राबवताना ई-पिक पाहणी म्हणजेच लागवड केलेल्या पिकाची नोंदणी डिजिटल क्रॉप सर्वे या अॅपवर करणे बंधनकारक केले आहे. तसेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक (AgriStack Farmer ID) ही बंधनकारक करण्यात आला आहे. ई-पिक पाहणी आणि प्रत्यक्ष काढलेला विमा यामध्ये तफावत आढळल्यास विमा कोणत्याही पातळीवर रद्द करण्यात येणार आहे व विमा हप्ता रक्कम जप्त करण्यात येईल.

शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक असल्याने केवळ लागवडीखाली असलेल्या अधिसूचित पिकांचाच विमा काढता येईल यावर्षीच्या योजनेत एक रुपयात विमा हप्ता मिळणार नाही अधिसूचित पिकांसाठी हा हप्ता २ टक्के आहे मात्र विमा कंपन्यांनी संभाव्य नुकसान भरपाईचा धोका लक्षात घेऊन विमा हप्ता कमी केला आहे.

Crop Insurance 2026
Panvel Slab Collapse: पनवेल महापालिका क्षेत्रात स्लॅब कोसळण्याच्या घटनांत वाढ

त्यामुळे जिल्ह्यात भात पिकासाठी प्रती हेक्टरी ६५० रु. व नाचणी पिकासाठी प्रती हेक्टरी ४०० रु. इतका विमा हप्ता रायगड जिल्ह्यासाठी आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड, अधिसूचित पिकाचे पेरणी केलेले स्वयंघोषणापत्र, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा, संमती पत्र, बँक पासबुक प्रत इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत.

योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ असून ई-पिक पाहणी व शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

..तर विमा हप्ता रक्कम होणार जप्त

यावर्षी ही योजना राबवताना ई-पिक पाहणी म्हणजेच लागवड केलेल्या पिकाची नोंदणी डिजिटल क्रॉप सर्वे या अॅपवर करणे बंधनकारक केले आहे. तसेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक (AgriStack Farmer ID) ही बंधनकारक करण्यात आला आहे. ई-पिक पाहणी आणि प्रत्यक्ष काढलेला विमा यामध्ये तफावत आढळल्यास विमा कोणत्याही पातळीवर रद्द करण्यात येणार आहे व विमा हप्ता रक्कम जप्त करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news