Panvel Slab Collapse: पनवेल महापालिका क्षेत्रात स्लॅब कोसळण्याच्या घटनांत वाढ

कामोठ्यात तीन स्लॅब दुर्घटना, तर १२९ मोठी झाडे पडली
Panvel Heavy Rain
Panvel Heavy RainPudhari
Published on
Updated on

विक्रम बाबर

पनवेल: सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल महापालिका हद्दीत स्लॅब कोसळण्याच्या आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांत कामोठे आणि कळंबोली परिसरात मिळून चार ठिकाणी स्लॅब कोसळल्याच्या घटना घडल्या असून, त्याच कालावधीत महापालिका हद्दीत चार दिवसात तब्बल १२९ झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही नोंदविण्यात आल्या आहेत.

कामोठे परिसरात स्लॅब कोसळण्याच्या तीन घटना घडल्या असून, त्यापैकी एका दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, एक जण जखमी झाला आहे. उर्वरित घटनेत जीवितहानी टळली.

Panvel Heavy Rain
Maharashtra Politics: मला बदनाम करा, पण महाराष्ट्राचा अवमान कराल तर सोडणार नाही! विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री आक्रमक

दरम्यान, कळंबोली शहरातही स्लॅब कोसळण्याची एक घटना समोर आली असून, संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. मात्र पनवेल महानगरपालिका पालिकेकडे केवळ दोन स्लॅप कोसळल्याची नोंद असल्याचे सांगण्यात येत आहे त्या पैकी एक पीओपी कोसळल्याचे सांगितले जात आहे.

याचबरोबर मुसळधार पावसामुळे शहरातील मोठ्या प्रमाणावर झाडेही उन्मळून पडत आहेत. गेल्या चार दिवसांत १२९ झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी काही वाहनांचे नुकसान झाले असून, महापालिकेच्या आपत्कालीन पथकांनी झाडे हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले.

स्लॅब कोसळण्याच्या आणि झाडे उन्मळून पडण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, जुन्या व धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांनी अधिक सतर्कता बाळगावी तसेच जोरदार वारे आणि पावसाच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, मात्र धोकादायक इमारत असून देखील रहिवाशी जीव मुठीत घेऊन त्या धोकादायक इमारतीमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे.

Panvel Heavy Rain
Karjat Local Train Disruption: नेरळ-भिवपुरीदरम्यान ट्रॅक खचला; कर्जत-सीएसएमटी लोकल विस्कळीत

पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी. विनंती करून देखील इमारतीं मधील सदस्य अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याचे समोर आले आहे. स्वसुरक्षेसाठी नागरिकांनी महापालिका अधिकाऱी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नगरसेवकाचे धोकादायक इमारतींना पाठबळ

रविवारी पहाटे कामोठे सेक्टर २१ मध्ये साई लीला अपार्टमेंट मध्ये एका घरातील स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती, या घटने नंतर पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनेची पाहणी केली, आणि या पाहणी दरम्यान इमारत धोकादायक असल्याचे समोर आले , या धोकादायक इमारतीचा अहवाल पहिल्या नंतर, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इमारत मोकळी करा, अशी विनंती केली आणि घटनेचे गांभीर्य समजून सांगितले मात्र त्याचवेळी यांच परिसरातील नगरसेवकांनी घटना स्थळी येऊन अधिकाऱ्य सोबत बोलणी करून, अधिकाऱ्यांना येथून जाण्याची विनंती केल्याची घटना समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news