Panvel Orchestra Bar | ''कमरीया लचकेरे, बाबु जरा बचके रे''वर ठुमके; पोलिसांच्या धाडीत बारमधील ‘अश्लील’ खेळ उघड!

पनवेल तालुका पोलिसांची धडक कारवाई... सहा महिला सिंगर ताब्यात
Panvel Police Action Orchestra Bar
कोनगाव येथील नाईट रायडर बारवर कारवाई करण्यात आली Pudhari
Published on
Updated on

Panvel Police Action Orchestra Bar

पनवेल : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑर्केस्ट्रा बारविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. कोनगाव येथील नाईट रायडर बार अँड रेस्टॉरंटमध्ये पोलिसांनी केलेल्या तपासणीत महिला सिंगर ग्राहकांच्या जवळ जाऊन अश्लील हावभाव व बीभत्स वर्तन करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी सहा महिला सिंगर, बार मॅनेजर आणि दोन वेटर अशा नऊ जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पनवेल तालुका पोलिसांच्या हद्दीतील ऑर्केस्ट्रा बारमध्ये नियमबाह्य प्रकार होत असल्यास कारवाई करण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सरदार वसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक १३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री कोनगाव येथील नाईट रायडर बारमध्ये दाखल झाले.

Panvel Police Action Orchestra Bar
Panvel Theft Case | शाळा-कॉलेज लुटण्याचा वेगळाच फंडा; ६५ वर्षीय सराईत चोरटा अटकेत

रात्री सुमारे १२.३५ वाजता पोलिसांनी बारमध्ये प्रवेश केला असता तेथे महिला सिंगर, वेटर, ग्राहक आणि मॅनेजर उपस्थित होते. त्यावेळी महिला सिंगर ‘कमरीया लचकेरे बाबु जरा बचके रे’ या गाण्यावर ग्राहकांच्या जवळ जाऊन अश्लील हावभाव करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ महिला सिंगरना बाजूला घेतले तसेच मॅनेजर आणि वेटरची चौकशी केली.

या कारवाईत सोनम राजेंद्र प्रसाद, श्वेता महेश गुडिया कशप, झुमा तारक दास, शालिनी छरी, प्रवासी जनक बहादुर आणि अंजली चंद या सहा महिला सिंगर, मॅनेजर प्रसन्नकुमार एस. श्रीवास्तव तसेच वेटर भीम कौलेश्वर पासवान आणि मिथुन अयोध्या पासवान यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

Panvel Police Action Orchestra Bar
Panvel Nanded Express Accident: पनवेल-नांदेड एक्स्प्रेसला जनावरांची धडक; ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक ठप्प

पोलिसांनी बारचा परवाना तसेच इतर आवश्यक कागदपत्रांचीही तपासणी केली. कागदपत्रांनुसार बारचा मालक अनंता दत्तात्रेय पाटील असल्याचे समोर आले. कारवाईदरम्यान कोणतीही वस्तू जप्त करण्यात आलेली नसून पंचनामा ई-साक्ष ॲपच्या माध्यमातून करण्यात आला.

पनवेल तालुका पोलिसांकडून परिसरातील ऑर्केस्ट्रा बारची तपासणी सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Panvel Police Action Orchestra Bar
Panvel News : कर्नाळ्यात ‘मंकी ब्रिज’ कोसळला; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

तळोजानंतर पनवेलही चर्चेत

ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली महिला वेटर आणि सिंगरकडून ग्राहकांचे मनोरंजन करताना अश्लील हावभाव तसेच नियमबाह्य प्रकार होत असल्याचे तळोजा आणि पनवेलमधील पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. नियमांचे उल्लंघन होत असतानाही काही ठिकाणी अशा प्रकारांना प्रोत्साहन दिले जात असल्याचेही कारवाईदरम्यान निदर्शनास आले.

त्यामुळे ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बारमालकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच नियम धाब्यावर बसविणाऱ्या बारमालकांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news