Panvel Nanded Express Accident: पनवेल-नांदेड एक्स्प्रेसला जनावरांची धडक; ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक ठप्प

हडपसर-लोणीदरम्यान अपघात; पाच गाड्या जागीच थांबल्या, पुणे-दौंड मार्गावरील वाहतूक विस्कळीत
Railway
RailwayPudhari
Published on
Updated on

पुणे: हडपसर ते लोणी या रेल्वेस्थानकांदरम्यान लोहमार्ग ओलांडणारी जनावरे पनवेल-नांदेड एक्स्प्रेसला धडकल्याने वाहतूक ठप्प झाली. बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास हा अपघात झाला. एक्स्प्रेसचे इंजिन जनावरांना धडकताच रेल्वे इंजिनला वीजपुरवठा करणारी ओव्हरहेड केबल तुटून पडली. परिणामी, या मार्गावरील पाच रेल्वेगाड्या जागीच बंद पडल्या. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले.

Railway
Chakan Talegaon Industrial Area Traffic Congestion: चाकण-तळेगावच्या वाहतूक कोंडीवर प्रशासनाचा दणका; ३१ ऑगस्टची डेडलाइन

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल-नांदेड एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १७६१३) हडपसर ते लोणी यादरम्यान जात असताना अचानक रेल्वेरुळावर आलेल्या गायीला गाडीची जोरदार धडक बसली. या अपघातामुळे ओव्हरहेड वायर तुटून रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

Railway
Chakan MIDC Companies: चाकण एमआयडीसीची अवस्था ‘आयसीयूतील रुग्णा’सारखी; २० कंपन्या खंडाळ्यात स्थलांतरित होणार

घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पुणे-दौंड मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून, प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून लवकरात लवकर दुरुस्ती पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Railway
Pune Tangerine Orange: पुणेकरांना भुरळ घालणाऱ्या टँजेरियन संत्र्याची आवक वाढली; गुलटेकडी बाजारात तीन टनांचा टप्पा

हडपसर ते लोणी रेल्वेस्थानकांदरम्यान रेल्वेच्या धडकेत एका गायीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली. या अपघातामुळे रेल्वेची ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून, पुणे रेल्वे विभागातील अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. घटनास्थळी पथक पाठवून दुरुस्तीचे काम सुरू आहे. दरम्यान, मार्गावरील गाड्या वळवल्या असून, काही गाड्या अलिकडील स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत.

हेमंतकुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news